top of page

खडूस आज्जीकडले आंबे

By Mrs. Ritu Patil Dike


आबा सायंकाळी मोबाईलवर मस्त जुनी गाणी ऐकत बागेत खुर्चीवर बसले होते. शुभम फाटकातून धावत त्यांच्याकडे आला , "आबा, हे बघा काय आणलं?" एकदम खुशीत शुभम दाखवू लागला. त्याच्या खिशात दोन कैऱ्या होत्या .

"अरे वा कैऱ्या, पण आणल्यास कुठून ?" आबा म्हणाले.

"त्या ना खडूस आजीच्या झाडाच्या कैऱ्या आहेत. आम्ही चोरून आणल्या. आम्ही रोज तीच्या घरासमोर खेळतो , कधी चुकून बॉल झाडाला लागला तर ओरडते ती, एखादं फुल तोडलं तर काडी घेऊन मागे धावते. आज ती घरी नव्हती तर आम्ही सगळ्यांनी मिळून तिच्याकडल्या झाडाच्या कैऱ्या मोठ्या काडीने पाडल्या. मज्जा ना आबा?"




" अस्स? हो मज्जाच आहे बाबा. जा आत नेऊन ठेव" आबा त्याला हसत म्हणाले. वृंदा लांबून हे सार बघत होती. आबांच्या ह्या वागण्याचं तिला नवल वाटलं नाही कारण शुभमला समजावून सांगायची त्यांची पद्धत नेहमीच वेगळी असते हे तिला माहीत होतं, पण तरीही आबांसाठी चहा घेऊन गेली तेव्हा न रहावून तिने विचारलं , "आबा तुम्ही शुभमला काहीच कसं बोलला नाहीत?"

आबा हसले आणि म्हणाले , "उद्या याचवेळी भेट म्हणजे सांगतो". वृंदाही हसली आणि शांतपणे घरात निघून गेली. दुसऱ्या दिवशी शुभम उठण्यापूर्वीच आबा काही कामासाठी बाहेरगावी निघून गेले. शुभम उठला आणि आवरून मित्रांबरोबर खेळायला जायचं म्हणून बॅट शोधू लागला पण बॅट काही दिसेना बॅट नाही तर खेळता येणार नाही हे त्याला माहीत होतं . थोड्यावेळाने वाचण्यासाठी तो कॉमिक्स शोधू लागला तर तेही सापडेना, टीव्ही बघण्यासाठी रिमोट शोधू लागला तेव्हा तेही सापडेना. वैतागून शुभम वृंदाकडे गेला वृंदा ने ही सारी शोधाशोध करण्यात त्याला मदत केली पण दोघांनाही काही सापडले नाही . संध्याकाळी आबा आले तेव्हा फाटकातूनच फुरगण्टून बसलेला शुभम त्यांना दिसला, "का रे काय झालं?"

" आबा, आजचा दिवस फार वाईट आहे. तुम्ही घरी नव्हते. माझी बॅट सापडेना , कॉमिक्स सापडेना, टीव्ही चा रिमोट ही सापडेना आजचा पूर्ण सुट्टीचा दिवस वाया गेला." सात वर्षांचा शुभम डोळ्यात आसवं आणून आबांना सांगत होता . आबा त्याच्याजवळ बसले आणि त्याच्या पाठीवर हात फिरवत म्हणाले, " काल ज्या खडूस आजींकडल्या तू कैऱ्या आणल्यास ना तिच्याकडे ती एकटीच राहते, ती झाड हीच तिची आवडती गोष्ट , काल ती नसताना तुम्ही त्या कैऱ्या तोडल्यात. ती परत आल्यानंतर तिला काय वाटलं असेल रे?" आबा शुभमच्या उत्तराची वाट पाहत त्याच्या चेहऱ्याकडे एकटक पाहू लागले. शुभमच्या चेहऱ्यावरचे भाव भराभर पालटले. तो एकदम म्हणाला,"आबा माझं चुकलं , मी असं करायला नको होतं. मी पुन्हा नाही असं करणार आणि मला कळावं म्हणून तुम्हीच माझं सगळं सामान मुद्दामून लपवलं ना?" आता मात्र आबा आणि शुभम खळखळून हसू लागले, मागे उभी असलेली वृंदाही त्यांना सामील झाली.


By Mrs. Ritu Patil Dike




3 views0 comments

Recent Posts

See All

He Said, He Said

By Vishnu J Inspector Raghav Soliah paced briskly around the room, the subtle aroma of his Marlboro trailing behind him. The police station was buzzing with activity, with his colleagues running aroun

Jurm Aur Jurmana

By Chirag उस्मान-लंगड़े ने बिल्डिंग के बेसमेंट में गाडी पार्क की ही थी कि अचानक किसी के कराहने ने की एक आवाज़ आईI आवाज़ सुनते ही उस्मान-लंगड़े का गुनगुनाना ऐसे बंध हो गया मानो किसी ने रिमोट-कंट्रोल पर म्य

bottom of page