किंचाळी
By Tejaswini(Tejoy)
आज मी ठरवले वृत्तपत्र वाचेल
सवयीप्रमाणे पान शेवटचेच वाचेल
खेळाडूंच्या विजयाची वाह व्वा भारी
पान पलटताच किंचाळी आली
लहान त्या जीवावर अनेक असे वार
मनावर झाला असेल किती प्रहार
पण माझ्या मनाला का रुतत नाही
हळव्या या मनाला का जाणवत नाही
स्वतःच्या मनावर घातला तो प्रबंध
मनावर दगड ठेवून केला प्रवास अखंड
कालच्या जखमा अजूनही ताज्या राहिल्या
लहानसा जीव नात्यापुढे गप्प राहिला
मन मारत मी कितपत जगायचे
कधीतरी माझे कोडे मीच सोडवायचे
दोन चापटांत मला काय न्याय मिळाला
शेवटी त्या जखमा मनावर घट्ट कोरल्या
अन्याय करतो कोणी घाव भरले मनी
सुटता सुटेना हे कोडे आले माझ्या ध्यानी
By Tejaswini(Tejoy)

Comments