करवून घे
By Mohini C. Halarnkar
देवा तुझ्याच साठी घेऊन आले
आरतीचे ताट l
हा पहा मांडला तुझ्याचसाठी
भक्तीचा पाट l
येऊन बस तू पाटावरती
घे माझी आरती l
तुझ्याचमुळे ती कळली मजला
हृदयातली आरती l
या आरतीत दंग होऊनी
विसरले मी स्वतःला l
धार पाण्याची लागली कशी बघ
माझ्या डोळ्याला l
नको मजला काही आता
दे थोडी शक्ती l
ज्या कारणे तू हा जन्म दिधला
करवून घे बेगी ती कृती l
By Mohini C. Halarnkar

Comments