ओठांवर नकार तुझ्या हृदयात प्रेम आहे.
By KALPESH SITARAM AHIRRAO
नात्याची सुरुवात अशी गोड झाली ,
माझ्या प्रेमाची झुळूक तुझ्याच नजरेत आली,
ह्या अथांग सृष्टीत तूच मला लाभलीस,
चेहरा लपवत तुझा तू, मला पाहून लाजलीस!
ओठांवर नकार तुझ्या हृदयात प्रेम आहे,
अशीच साथ तू दे, मला तुझे होणे आहे!
ओढ मला ही तुझीच लागलेली,
सवयींना माझ्या आता तूझी गरज भासलेली,
माझ्या स्वप्नांना तुझ्या विश्वासाची पंख लाभलेली,
आयुष्यात आता माझ्या तू सोबत चाललेली!
ओठांवर नकार तुझ्या हृदयात प्रेम आहे,
न सांगता मला तू,नजरेत कळविले आहेस!
नकळत मला तू प्रेमाची स्पंदन देऊन गेली,
ह्याच क्षणांवर आपली मन जुळुन गेली,
आता ह्या नात्यात दोघेही जवळ येऊ लागली,
अशीच प्रेमाची नाती आपली हळुवार जुळत गेली!
ओठांवर नकार तुझ्या हृदयात प्रेम आहे,
हीच ग आपली आठवण नेहमीच आपल्या सोबत आहे!
By KALPESH SITARAM AHIRRAO

Comments