ओंकारचं लग्न
- Hashtag Kalakar
- Sep 30, 2022
- 1 min read
By AMEY KSHIRSAGAR
नने.. 2 ताई, ओंकार दादा , नरेंद्र दादा, सगळ्यांचं कौतुक करावं तेवढं कमी..दंगा मस्ती करत प्रेषित-केया या छोट्यानी सुद्धा भरपूर कामं ओढली.. तुम्ही फार छान लोकं जोडली आहेत.. श्रीमंती आहे ही तुमची।
काकूंना थोडं मोकळं होऊन हसताना नाचताना बघून खूप गोड वाटलं.. लग्न लागत असताना मी स्टेजवर त्यांच्या शेजारीच उभा होतो.. त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे, आनंदाचे आणि चिंता मिटल्याचे असे एकत्रित भाव माझ्या नजरेतून सुटले नाहीत.. मी न राहवून म्हणालो, "काकू 6 महिन्यात दोन्ही जबाबदाऱ्यांतून मुक्त झालात",
"होय बाबा, सहा तरी कुठे चारच महिने" इति काकू. नवीन विहिणबाईंना आलेलं दडपण त्यांच्याशी बोलत बोलत त्यांना आश्वस्त करत कमी होईल हे बघत, त्याचवेळी 4 महिने जुन्या विहिणबाईंना यथोचित मान देत त्यांना फुगडी घालायला लावत काकू यजमानपद उत्तम प्रकारे सांभाळत होत्या.
आता थोडं तुझं कौतुक.
जिथं नाचायचं तिथं नाचायला पुढे, बाकी लोकांना भेटणं असेल किंवा त्यांना हवं नको बघणं असेल त्या त्या वेळी ननीची ऐश्वर्या आणि ऐश्वर्याची ननी बेमालूमपणे होत होती.. तू लहान असून, एकदम जबाबदारीनं सगळं पार पाडलंस.. मोठी झालीस..
आमचा ओंक्या बिचारा आहे.. पापभिरू आहे.. शक्यतो आपल्यामुळे कुणाला त्रास कसा होणार नाही आणि होता होईल तेवढी आपली मदत कशी होईल असा निस्वार्थी विचार करणारा.. चेष्टेखोर आहे गप्पा मारेल पण मनातलं मनातच ठेवणारा आहे.. त्यामुळे त्याची हौस झालेली बघून डोळ्याचं पारणं फिटलं..हा प्रणोती वर भाळलेला बघून मज्जा वाटत होती.. काही नुकत्याच अनुभवलेल्या हळुवार क्षणांची आठवणही झाली..
बाकी तुमचे नाच, चेतन-श्रीरंग यांचे अफलातून आवाज यांनी एकूणच चार चांद लागले. त्या गीटारिस्टचं स्पेशल कौतुक..फार गुणी होता तो..
जेवणात आंबा बासुंदी वर मनसोक्तपणे ताव मारायला मिळाला त्यामुळे घरी येणाऱ्या लक्ष्मीचं स्वागत करायला आम्हाला शक्ती आली.. एकूण काय मला मस्त मज्जा आली..
मेघाला लग्नाचा वृत्तांत देताना हे सगळं अचानक सुचलं आणि लिहिता झालो..
By AMEY KSHIRSAGAR

Comments