एक विचारू
- Hashtag Kalakar
- 8 hours ago
- 1 min read
By Mohini C. Halarnkar
विठुराया एक विचारू
सांगशील का मला ?
युगान युगे उभा आहेस
वेदना नाही होत तुझ्या पायाला?
कटेवरचे हात
खाली घेतच नाहीस
विराम म्हणून पण
थोडा बसतही नाहीस l
राज्य सगळं चालवतोस
अगदी उभा राहून
सखया हे सगळं करताना
जात नाहीस का रे थकून?
आणखीन एक प्रश्न माझा
देशील का रे उत्तर ?
रखुमाई नाही का रे रागवत
तुझ्या या वागण्यावर?
सगळ्यांचं सगळं करतोस
विठुराया तुझं काय?
बसणं नाही झोपणं नाही
म्हणूनच देवाशयनी एकादशी काय
झोपायच्या आधी
माझं एकच काम कर
माणूस नावाच्या जनावराला
परत माणूस मात्र कर l
By Mohini C. Halarnkar

Comments