top of page

एक वरपरीक्षा अशी ही..

Nov 24, 2022
4 min read

Updated: Sep 3, 2025

By Saili Amberkar


उन्हाळा चालू झाला होता. दापोली शहरातल्या नयणगावात तर मुलांची नुसती धमाल चालू होती कारण सर्व मुलांचे परीक्षा आज आटोपल्या होत्या. निर्मला आजी तर जामच खुश होती. तिने सगुणाला बाहेरचं आंगण आणि घरातला सर्व साफ-सफाई करायला सांगितली. निर्मला आजी ने तर स्वतःचा हाताने आंगण मध्ये शेणाची सार्वा-सावर केली. हे पाहताच बाजूच्या जोशी काकूने विचारलं, "काय हो आजी! काही विशेष कार्यक्रम आहे का तुमच्याकडे?" त्यावर निर्मला आजीने उत्तर दिले, "आमची साऊबाई येत आहे इतक्या वर्षा नंतर. साता-समुद्रा पलीकडे गेली होती ती शिकण्यासाठी. परत येते आहे." जोशी काकूने स्मित हास्य दिले आणि आपल्या कामाला जाऊ लागल्या.

साऊबाई म्हणजेच सावी, निर्मला आजीची एकूलती-एक नात. निर्मला आजी प्रेमाने सावीला साऊबाई म्हणत. सात-आठ वर्षांपूर्वी सावी ही तिच्या पुढच्या शिक्षणासाठी परदेशी गेली आणि ती तिथलीच झाली. पण हो, न चुकता मात्र तिचं महिन्यातून २ पत्र आजीला असायचंच. सावी जेम-तेम ६ वर्षाची असताना तिचे वडील हृदय रोगाने मरण पावले. आणि वर्ष-दीडवर्ष मध्ये सावीची आई देखील तिला सोडून गेली होती. तेव्हा पासून आता पर्यंत निर्मला आजीने सावीला तळ हाताच्या फोडा प्रमाणे जपलं होतं. तीला हवं-नको त्याची सर्व काळजी आजीने घेतली.

सावी जस-जशी प्रौढ होत गेली, तसं ती स्वतःची जबाबदारी घेऊ लागली. तिने गावातल्या मराठी शाळेतून आपले एस.एस.सी पूर्ण केले. त्यानंतर तिने डॉक्टरकीचा अभयास करण्यासाठी दापोली शहरातल्या महाविद्यालयात शिक्षण घेऊन प्रथम श्रेणी प्राप्त केली. ते होताच तिने वेग-वेगळ्या परीक्षा देऊन बाहेरच्या देशात जाण्याची संधी प्राप्त केली. या सर्वाला निर्मला आजीचा नेहमीच पाठिंबा असायचा.

आठ वर्षे अशीच सरली. सावी कुठच्या हि क्षणी दाखल होणार होती. निर्मला आजी ने सगुणाला आरतीचे ताठ तयार करायला सांगितले. आजी ने आज खास सावीच्या आवडतं पदार्थाचा बेत केला होता. अचानक बाहेरून आवाज आला. "आजी, आजी! हे बघ, मी आले". आजी तातडीने बाहेरच्या दिशेस चालू लागली. आपल्या साऊबाईला पाहून निर्मला आजीला आनंद झाला. तिचे अश्रू अनावर झाले. आजी ने सावीला घट्ट मिठी मारली. सावी ने आजीला नमस्कार केला.

आजीने सावीला ओवाळलं. तिची द्रुष्ट काढली. सावीच्यां घरातल्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. सर्व जेवण-पाणी करून झालं. आता पुढचा सर्व वेळ आजी आणि नातीचा होता. त्या दोघीनीं इकडच्या -तिकडच्या गप्पा मारल्या. निर्मला आजी सावी साठी मैत्रिणी सारखीच होती. सावी आपलं सर्व सुख-दुःख मन मोकळे पनाने तिच्याकडे बोलतं असे. असेच बोलता बोलता सावीने आजीला गौतम विषयी असेलेले प्रेम या बद्दल सांगितले. निर्मला आजी हे ऐकून थोडी निराशच झाली. साऊबाई आता मोठी झाली आहे हे तिला जाणवलं. अशी लग्न करून सावी दुसऱ्याच्या घरी जाणार हे निर्मला आजीला पटत न्हवतं. आजी काही न बोलताच तिथून निघून गेली.

रात्रीचे जेवण केल्यावर सावी अंगणात फेरी मारत होती. तेवढ्यात आजी तिथे आली. आजी सावी जवळ गेली व म्हणाली, "मी भेटायला तयार आहे गौतमरावांना. पण, मी त्यांची वर-परीक्षा घेईन आणि जर त्यात ते उत्तीर्ण झाले तरच या लग्नाला मी होकार देईन". हे ऐकून सावी एक्दम खुश झाली. तिने आजीला घट्ट मिठी मारली. झोपताना सावीने गौतमला मेसेज करून इकडची सर्व हाल-हवाल सांगितली व आजीने घातलेली अट या बद्दल देखील सांगितलं.

दर मे महिन्यात नयणगावात जत्रा भरत असे. ही जत्रा ७-८ दिवस चालत. सावी ने गौतमला जत्रे दरम्यान बोलावले होते. तसा गौतम जत्रेच्या शेवटच्या दिवशील येणार असा त्याने सावीला कळवलं होतं पण तो २ दिवस आधीच आला होता. सावीने पाठवलेल्या पत्त्यावर गौतम येऊन पोचला. त्याला सावीला आश्चर्याचा धक्का द्याचा होता पण नेमकी सावी त्यावेळी घरी न्हवती. गौतम ने "सावी....सावी" असा आवाज दिला. मागील बाजूला काम करत असणारी निर्मला आजी दारासमोर येऊन थांबली. आणि उभ्या असलेल्या इसमाची चौकशी करू लागली.


"आजी - तुम्ही कोण?

गौतम - आजी मी गौतम, सावीचा मित्र. आम्ही दोघं एकत्र शिकत होतो U.K ला.

आजी - गौतमराव ?? तुम्ही तर पर्वा येणार होता ना. आज कसे काय आलात. तेही न सांगता?

गौतम - आजी मी सावीला surprise द्याला लवकर आलो

आजी - सर .. काय?

गौतम - surprise आश्चर्यचकित करायला.

आजी - हम्म .. ती आता घरी नाही पण. तिच्या मित्राबरोबर बाहेर गेली आहे जत्रेला.

(निर्मला आजीला वाटलं कि असे सांगून गौतम-सावी मध्ये फूट पडत येईल आणि सहज या नात्याला नकार देता येईल)

गौतम (हसत) - अरे वाह! ठीके. तिची वाट बघतो इथे बसून.

आजी (टोमणा मारत) - नको नको. सावी ला कळलं कि मी तीच्या मित्राला असं बाहेर उन्हात बसवून ठेवलं तर रागवेल माझ्यावर. आत या तुम्ही. "

आजी ने गौतमला चहा नाश्ता करायला दिला. तेवढ्यातच सांगून घरात आली. आजी ने तिला परत जाण्यास सांगितले आणि संध्याकाळ पर्यंत सावीला निलेश सोबत गुंतवून ठेव असं खडसावून आज्ञा दिली. सगुणा तिथून निघून गेली.

आता घरात आजी आणि गौतम होते. आजी स्वयंपाक घरात गेली. गौतम हि तिच्या पाठोपाठ गेला आणि आजीला मदतीचा हात देऊ लागला. आजी ने विचारलं "तुम्ही काय करता इथे? मुलं स्वयंपाक घरात शोभतात का? असे बोलून आजी गौतम ला बाहेर जाऊन बसायला सांगत होती. "मुलं स्वयंपाक घरात शोभत नाहीत, असे तरी कुठी कोण म्हणाला आहे?" गौतम ने प्रश्न केला. "आणि स्वयंपाक करणं, धुनी-भांडी करणं, घरातला केर काढणं हे सर्व मुलीनेच केला पाहिजे असा देखील काही नियम नाही आहे." गौतम म्हणाला. "या सर्व मूलभूत गोष्टी आहेत आजी. यात मुलींनेच राब-राब राबायचं आणि मुलांनी आयतं बसून खायचं असा उठेही नियम नाही आहे." हे बोलत असताना गौतमने धुवायला टाकलेली भांडी साफ करून ठेवली. निर्मला आजी हे सर्व ऐकून आश्चर्य चकित झाली.

उलट गौतमने आजीला आरामात बसायला सांगितलं आणि गौतमने स्वयंपाक घराचा ताबा घेतला. आजीला कुठल्या गोष्टी कुठे ठेवल्या आहेत हे विचारात गौतमने रात्रीच्या जेवणाची तयारी करून ठेवली. भर येताच त्याने पाहिले निर्मला आजीचा नुकताच डोळा लागला आहे. त्याने आजीला त्रास न देता बाकी घराची सफाई केली. सर्व काम झाल्यावर गौतम आजी शेजारी येऊन बसला आणि तिचे पाय चेपू लागला. आजी ला वाटलं कि सावीच तिचे पाय दाबून देत आहे.

आजी लगेच उठली व बघितला तर गौतम तिच्या बाजूला बसला होता. आजी थक्क होऊन म्हणाली, "हे काय करताय गौतम बाळ ?'. तेव्हढ्यात गौतमने उत्तर दिले "हे बघ आजी. मला तु गौतम राव पासून गौतम बाळ बोलली आहेस. तर हे बाळ तुझी सेवा करून पुण्य कमवत आहे." हे ऐकून निर्मला आजीच्या डोळ्यात पाणी आले. तेवढ्यातच सावी जत्रेतून परतली. अचानक गौतमला समोर पाहून तिला धक्काच बसला. "गौतम ??? तू??" हे बोलत सावी गौतम पाशी जातच होती कि तेव्हड्यात ती भानावर आली.

आजी ने सावीला जवळ बोलावलं व म्हणाली, "सावे, तुझी निवड एक्दम उत्कृष्ट आहे. असा जोडीदार मिळायला भाग्य लागतं हे नक्कीच." हे बोलून आजीने सावीला मिठी मारली. गौतमला जवळ बोलवून आजी म्हणाली, "बाळ, तू माझं मन जिंकलंस. तू हि वर परीक्षा उत्तीर्ण झाला आहेस. आमच्या साऊबाईला सुखात ठेवा." हे बोलून निर्मला आजीने सावी आणि गौतम या दोघांना जवळ घेतलं. आजी चहा बनवायला जात होती. तेव्हढ्यात गौतम म्हणाला, "आजी तू बस निवांत. मी चहा आणतो. आज या लाडक्या जावयाच्या हातची चहा पियुन बघ. "

हे ऐकून सावी म्हणाली, " आजी, तू चक्क स्वयंपाक घराचा ताबा दुसऱ्याला दिलासा?" "ए , ते कोणी दुसरे नाही आहेत, समजलं ना? माझे लाडके जावई आहेत ते. " तिघेही हे ऐकून हसू लागले.


समाप्त


By Saili Amberkar





Recent Posts

See All
Unread

By Roshan Tara “You’ve never written me a love letter,” she teased, eyes bright. “Like in old movies. Handwritten. Just once—for my birthday.” He promised. But fate was faster than his pen. She never

 
 
 
Teaming Up and Escaping From Kidnap

By Hemasri Nithya Chodagiri “I don’t know how I got myself here”. “I'm an ordinary orphan and my name is Henry”. “My dad raised me until I was 10 but after that my dad died in a museum fire and my mom

 
 
 
The First Sight

By Gaayathri Arasakumar “ Senapathi , move forward, come what may! Let no Deva or man stop us!” I bellowed over the chaos of the battlefield. Perhaps, Mallan had not heard my cry over the maddening t

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page