उपवास
Updated: Sep 20, 2022
By Pallavi Kansara
उपवास करणारे खरंच उपवास करतात का?
जिभेवरचा सय्यम बोलताना राखतात का?
उपवास करणारे खरंच उपवास करतात का?
सात्विक फराळ करताना विचार सात्विक करतात का?
उपवास करणारे खरंच उपवास करतात का?
जप माळ ओढताना एक सत्कर्म करीन असं म्हणतात का?
उपवास करणारे खरंच उपवास करतात का?
मी अमुक दिवशी उपवास करेन असं म्हणणारे
माझ्या अन्नाचा काही भाग गरिबाला देईन
असं काहीतरी म्हणतात का?
उपवास करणारे खरंच उपवास करतात का?
By Pallavi Kansara

Comments