उत्तरार्ध
By Vikas Rajendra Pisore
कडरस्त्याच्या बांधावर एक जर्र म्हातारा बसला
सुन्न झाल्यासारखा.......
आयुष्याची गणितं मोजत असावा कदाचित
शुन्य झाल्यासारखा......
आयुष्याचा पूर्वार्ध लोटला असेल कैकपुर्वी
तरी एकटक नजर लावून बसला
दग्न झाल्यासारखा......
कधी वाऱ्यांना दिशा विचारायचा त्यांची
तर कधी ताऱ्यांना दशा त्यांची
आणि आठवायचा यौवनाची नशा
प्रक्षुण्ण झाल्यासारखा......
आयुष्याचा मध्यार्थ तर बरळत एकसारखा
हुंदकुंन एकाएकीच रडला
विषण्ण झाल्यासारखा.....
आता उत्तरार्ध रंगलाय त्याचा केवळ एका क्षणाचा
तरी स्मित हसला फक्त
मग्न झाल्यासारखा.....
अन् दोन आसवे स्वतःसाठीच गाळत
अंतर्धान पावला राखेत
भग्न झाल्यासारखा......
कायमचा.....
By Vikas Rajendra Pisore

Comments