आला पाऊस पाऊस
By Dhiraj Phadke
दूर दूर रानांत,
माडांच्या या बनात,
आंब्याच्या त्या राईत,
अन् डुलणाऱ्या रोपांत,
वादळवारा जोर धरे,
म्हणे; आला पाऊस पाऊस..
काळ्याभोर नभांतूनी,
भिजलेल्या पानांतूनी,
थिजलेल्या फुलांतूनी,
एक आवाज येई,
अजून बरस बरस,
आला पाऊस पाऊस..
ओल्या ओल्या मातीत,
धुंद बेहोष हवेत,
चिंब चिंब आसमंत,
सर्वत्र पाणीच पाणीच
धरणीमाय म्हणे,
हे तुझेच दिवस,
आला पाऊस पाऊस..
By Dhiraj Phadke

Comments