आयुष्य एक प्रवास - By Sanjay Padmakar Kulkarni
Written By: Sanjay Padmakar Kulkarni
Category: Essay
Competition: Poetry and Creative Writing Competition 2026
Sanjay Padmakar Kulkarni brings to the fore "आयुष्य एक प्रवास," an evocative essay submitted to the Poetry and Creative Writing Competition 2026. In this reflective piece, Sanjay delves into the metaphorical journey that life represents, exploring the intertwined paths of experience and growth. This entry is a testament to the enduring nature of life's voyage, capturing its essence through the lens of personal and universal milestones.
About the Work
"आयुष्य एक प्रवास" is a meditative exploration of life's various stages, from the innocence of childhood to the complexities of adulthood. Sanjay uses vivid imagery and poignant reflections to illustrate the transformative moments that define our existence. The essay captures the essence of resilience and acceptance, portraying life as a continuous journey filled with challenges, triumphs, and the inevitable passage of time.
aayushya ek prawas
Original Submission by Sanjay Padmakar Kulkarni
आयुष्य एक प्रवास -एका वाटेवरचा
वाटा आणि प्रवास एक अभिन्न नातं. किंबहुना आयुष्य हा एक प्रवास ही अन वाट ही. आयुष्याच्या या वाटेवरून चालताना प्रत्येक जण अनुभवतो ......हा प्रवास आयुष्याचा ...हा प्रवास वयाचा ...हा प्रवास सुख दु:खांचा...हा प्रवास स्थानांचा. वाट ही एकच असते मात्र वळणा वळणा वर प्रवासाचे टप्पे बदलतात आणि श्वास सुरु आहे तोपर्यंत हा प्रवास सुरूच राहतो.
जन्माला आल्यापासून ते शालेय जीवनपर्यन्तचा हा प्रवासाचा पहिला टप्पा. मायेच्या पदराखाली घडलेला उबदार प्रवास ...जणू रेल्वेच्या AC बोगीतल्या प्रवासासारखा. मात्र हा उबदारपणा प्रत्येकाच्या वाट्याला येतोच असे नाही .
शालेय जीवन संपले कि तारूण्याच्या उंबरठ्यावर एक वळण येते आणि सुरु होतो कॉलेज लाईफ चा अनोखा व अविस्मरणीय प्रवास. कोणाच्या तरी एका स्मितहास्याने , चोरट्या कटाक्षाने आतापर्यंतचा AC बोगीतला हा प्रवास विमान प्रवासात कधी परावर्तीत होतो हे कळतच नाही. ह्या प्रवासात आपण नकळत देहभान विसरून स्वप्नांच्या दुनियेत उंच उंच भरारी घेत असतो एखाद्या रम्य सहवासात . मात्र हा हवाहवासा वाटणारा स्वप्नवत कॉलेज प्रवास चटकन संपतो, करणार काय शेवटी विमान प्रवासच तो.
पुन्हा एक वळण येते ,आणि प्रवासाचा पुढचा टप्पा सुरु होतो . आतापर्यंतच्या प्रवासात पोटातले पाणी ही हललेले नसते मात्र या टप्प्याच्या सुरुवातीलाच मोठे झटके बसायला सुरुवात होते. कॉलेज च्या मोरपंखी आयुष्यातील गोड आठवणींच्या धुंदीत सुरु असलेल्या हळुवार प्रवासात हरवलेले आपण खाडकन जागे होतो अन पाहतो तर काय ...पुढचा मार्ग अत्यंत बिकट असतो , खाचखळग्यानी काट्याकुट्यानी भरलेला. अनेक आवाहने आपली वाट पाहात असतात . वडिलांची सेवानिवृत्ती , लहान भावंडांची शिक्षण, बहिणीचे लग्न, आजारपण आणि बेरोजगारी. आणि सुरु होतो खरा संघर्ष , या रस्त्यावर कधी कधी उपासही घडतो तर कधी वडापाव भूक भागवतो . कॉलेज लाईफ मधील विमानप्रवासात भेटलेली मैत्रीण नकळत दुरावते, तिचा वाट वेगळी होते अन प्रवास ही. या प्रवासात मात्र पुढे पुढे जावेच लागते , एकटेच. या प्रवासात आपण थकतो, वैतागतो . आयुष्याच्या रणरणत्या उन्हातील चटके आपणांस जेरीस आणतात , मात्र या खडतर प्रवासाच्या गर्भातच उद्याचा उषा:काळ दडलेला असतो हे मात्र तितकेच खरे.
"वो सिकंदर ही दोस्तो कहलाता है , हारी बाजी को जितना जिसे आता है ,
निकलेंगे मैदान मी हम जिस दिन झुमके , धरती बोले गी उस दिन कदम चुम के "
यस....ह्या दुर्दम्य आत्मविश्वासासोबत न डगमगता पुढे गेलो तर हा खडतर प्रवास एका वळणावर निश्चितपणे सुखद होतो ....आयुष्याचे सत्य आपण स्वीकारलेले असते, तडजोडीची तयारी केलेली असते ..या दूर जाणाऱ्या वाटेवर नकळत कानावर सूर पडतात
" ही वाट दूर जाते , स्वप्नामधील गावा , माझ्या मनातला असेल का तेथे रावा "
एक हमसफर एका थांब्यावर भेटतो/भेटते , कायमची सोबत देण्यासाठी ....स्वप्नांचे धुके विरलेले असते समोर स्वच्छ सूर्यप्रकाश आणि लांबवर जाणारी वाट ...वाट तीच खडतर मात्र आपण आता सरावलेलो असतो त्या अडथळ्यांना आणि सोबत आता कोणीतरी असते सावरणारे .
परत नवीन नवलाईचा ,आशेचा , आकांक्षांचा , स्वप्नांचा प्रवास सुरु होतो या प्रवासात कोणी परी नसते आणि नसतो कोणी angel , हो मात्र असतो एक राजा अन एक राणी.
आणि नकळत या प्रवासात आपली गाडी वेग घेते , कधी ती सुकाणू सांभाळते तर कधी तो प्रवासाला दिशा देतो तिच्या भक्कम आधारावर , प्रवासाच्या या टप्प्यात एक छोटेसे घरटे विणले जाते , आयुष्यातील अंतिम पडाव, विश्रांतीसाठी ....मात्र प्रवास थांबत नाही ...हा प्रवास मात्र स्वप्नातला नसतो तर असतो वास्तवातला. पुढे प्रवासात काही चिमण्या प्रवाश्यांचे आगमन होते आणि जबाबदाऱ्या वाढतात. मात्र दोघेही एकमेकांच्या आधारावर, विश्वासावर आनंदाने मार्गाक्रमण करत असतात . एकमेकांच्या सहवासात , चिमणपाखरांच्या किलबिलाटात या वाटेवरील काटे ही सुखद वाटत असतात , म्हणतात ना
" वाटेवर काटे वेचित चाललो , वाटले जसा फ़ुलाफ़ुलात चाललो "
प्रवासात पुढे एका वळणावर जाणवते की आता प्रवासाची गती मंदावली आहे. चिमणी पाखर मोठी झाली असून त्यांच्या पंखात बळ आले आहे . त्यांचा उबदार AC बोगीतला प्रवास आता पूर्ण झालेला असतो आणि एका वळणावर ती नव्या जोमाने उड्डाण करून त्यांच्या स्वतंत्र प्रवासाला सुरुवात करतात. सोबत नेतात आपल्या आशिर्वादाची शिदोरी, सोडून जातात न संपणाऱ्या आठवणी .
मग उरतात फक्त ती दोघे ..आणि सोबत संथ , शांत प्रवास . कसली घाई नाही , कुठले टार्गेट नाही ..वाट तीच मात्र आता पूर्वीची वर्दळ नाही....तरी ही प्रवास सुरूच असतो ...प्रत्येक श्वासासोबत..
दुर्दैवाने सहचराने साथ सोडला तरी प्रवास थांबत नाही मात्र आपण सुकाणू सोडून देतो आणि वाट नेईल तिथे भरकटत जातो .... एकट्याचा प्रवास सुरूच असतो श्वासासोबत ...कारण श्वास सुरु असतो ..म्हणतात ना ..
" तुझ्या पासून दूर गेल्यावरही तुझी आठवण प्रत्येक पावलावर जाणवते आहे , तू सोबत नसताना प्रत्येक क्षणांची चाहूल मला त्याच वाटेवर बोलावते आहे.."
आयुष्य एक प्रवास ………एका वाटेवरचा……न संपणारा
About the Competition
The Poetry and Creative Writing Competition 2026 by Hashtag Kalakar celebrates the richness of creative expression. It invites participants from diverse backgrounds to share their unique voices through poetry, essays, and creative writing. This competition aims to foster a community of artists and writers who explore the depths of human experience through literature.
We extend our heartfelt thanks to Sanjay Padmakar Kulkarni for sharing "आयुष्य एक प्रवास" with the Poetry and Creative Writing Competition 2026. This reflective piece offers profound insights into the journey of life and its myriad experiences. We appreciate Sanjay's contribution to the competition and look forward to more of his thought-provoking work.
About Hashtag Kalakar
Hashtag Kalakar is a creative platform dedicated to providing artists, writers, singers and other creative talents with opportunities to showcase their work and reach wider audiences through competitions, features and creative initiatives.

Comments