top of page

असे होते ते नैसर्गिक मनोरंजन!

By Arham Sushma Sudarshan Bandekar


रोजच्या कामांनी वाढवला होता माझा थकवा, 

मनःशांती साठी कुठली तरी जागा कळवा!

चार भिंतींचा सुद्धा आला होता कंटाळा, 

संपूर्ण दिवसासाठी लावला होता घराला टाळा.

प्रवेश केला, होती एक आठवणीतली जागा,

पण जाऊन झाला मनाला त्रागा,

धक्का लागून दोन युवक होते एकमेकांशी भांडत,

अड्ड्यावरील इसम होते पत्ते मांडत. 

निरागस मनं होती रडत,

भीतीने गेले पक्षी उडत. 

प्रदूषित वातावरणात फुललेली ही हिरवळ बाग,

पर्याय सापडला नाही म्हणून आला स्वतःचा राग. 

चालत-चालत गेलो शहरापासून लांब,

पाणंदीच्या आडोश्याला होता एक लाकडी खांब.

अडकवलेल्या फलकावर लिहिलेले होते ‘स्वागत’,

ओळख नसताना ही झालो होतो मी तिथला अभ्यागत. 

घनदाट झाडांची होती ती वसाहत, 

कीटक, पशुपक्षी सगळे होते तिथे राहत. 

फुलांच्या वेली सजल्या होत्या मुख्यद्वारावरती,

पहिले चरण ठेवले त्या सुगंधी मातीवरती.

चालू झाला तो पक्ष्यांचा मंजुळ आवाज, 

कधी कळालंच नाही शीतल झालं हे माझं मन नाराज. 

क्षणाचा विलंब न करता झाला माझ्यावर रंगीबेरंगी फुलांचा वर्षाव,

जसे कीर्तीकाराचे स्वागत असावे त्यात नव्हता कशाचाच अभाव!

निसर्गाचे अमूल्य कृत्य आपुलकीचे, कुठेच नाही स्वार्थ,

कपिलाष्टीचा योग जसा माझ्यासारखे क्वचित येणारे निसर्गप्रेमी याच्यासाठी परमार्थ. 

सतत विचार करणार्‍या माझ्या मनालाही व्हावं लागलं सौम्य,

प्रदर्शनात आल्यासारखे विविध झाडेझुडपे पाहून वाटले रम्य!

खोलवर जात राहिलो तसे अजिबात नव्हती भीती की मागे वळून पळू,

कोणत्या नं कोणत्या रूपात मी ही आहे या निसर्गाचच लेकरू.

दगडांतून खळाळतं पाणी तयार करतं तलाव जे आहे इथल्या प्रत्येक जीवासाठी पुष्य, 

सूर्यकिरण व फुलपाखरांच्या साक्षीने शोभला तलावात प्रतिबिंबीत झालेला इंद्रधनुष्य. 

पायाला लागत होती वाळू जश्या कमी झाल्या कडक भाटा,

पाऊल पुढे टाकताच धावत आल्या सागर लाटा. 

लाटांना पाहताच स्मरणातील ते विचार चमकले,

थोड्या वेळासाठी लाटांऐवजी नयन कुठेच नाही फिरले. 

लाटांनी एखादी वस्तू पळवून नेली म्हणून त्यांनी म्हटले समुद्राला चोर, 

पण समुद्राच्या बाष्पीभवनाने जेव्हा पडतो पाऊस तेव्हा फुलवून पिसारा नाचतो मोर; 

लाटांनी ओढले त्या जीवलगाला म्हणून म्हणतात समुद्राने केली हत्या,

पण मच्छिमारांच्या कुटुंबाचा जीवनदाताच तर आहे दर्या!

प्रश्न आहे ज्याचा-त्याचा स्वतंत्र असे दृष्टीकोण, 

निरोगी माणसाने यावर दुर्लक्ष करत बाळगावे सर्वोत्तम मौन.  

मग पहा या लाटांसारख्या सर्जनाच्या वाटा आपसूक येतील,

घेऊन तुम्हाला तुमच्या इच्छित जागी सोडतील.  

विचारमालिका थांबवत अनुभवणे चालू ठेवले, 

धापकन आवाज करत समोर एक शहाळं पडले.

थकलेला मी त्याचे मधुर पाणी पिणे होते त्यास अपेक्षित, 

दुर्दैवाने पाणी मिळाले नाही कारण साधने नव्हती उचित. 

शंख-शिंपल्या गोळा करणे आहे माझा छंद,

एकापेक्षा एक तसे होते त्यांस विविध आकार व छटांचे रंग. 

मला पाहण्यासाठी समुद्रातून उडी मारत होते उत्सुक्त मासे,

आठवण म्हणून तिथल्या वाळूने जपले माझ्या पावलांचे ठसे! 

त्या तेजवान वातावरणात म्हणाला असता एक कवी;

की दूर पर्यंत झाल्या होत्या अदृश्य होडी, क्षितिजावर टेकला आहे लालबिंब रवी!

सकारात्मक ऊर्जेचा झाला होता संचार, 

त्यास कधी न सोडण्याचा आला होता विचार.

दूषित वातावरणापासून दूर जाण्याचा हाच होता योग्य पथ,

अस्ताला जाण्यास सज्ज झाला रवीचा रथ.   

त्याचवेळी अचानक घातली साद कामाने,

तिथल्या थंडाव्यात जराही भिजले नाही वस्त्र घामाने! 

पुन्हा पहायची होती ती फुले टवटवीत बहरलेली,  

येऊन पाहतो तर काय सर्व होती कोमेजलेली.  

कदाचित माझ्या परतण्याणे येत असावा त्या दुःखी जीवांवर भार, 

तृप्त मनाने मानले त्या निसर्गाचे आभार. 

मुख्यद्वार बंद करताना नजर होती शून्यात, 

नक्की भेट देणार तुला माझ्या पुढच्या फावल्या वेळात. 

चार भिंतीत परतून ही करत होतो त्या दुर्मिळ क्षणांचे चिंतन,

मी तर म्हणतो प्रत्येकाने लाभ घ्यावा असे होते ते नैसर्गिक मनोरंजन!  


By Arham Sushma Sudarshan Bandekar


Recent Posts

See All
Dumb or In Love

By Kavya Mehulkumar Mehta are poets dumb — or just in love? to the world, they may seem dumb, but for them, love is inevitable. poems are reminders of love that can’t be forgotten, shan’t be forgotten

 
 
 
A Future So Azure

By Inayah Fathima Faeez Tomorrow looms unsure, muffled by the deep Thumbs twiddling, barriers never-ending, failure and nothing to reap At the shore lie the choices, imposing, leading to journeys impo

 
 
 
Letting Go In Layers

By Inayah Fathima Faeez Some part of us is cold and shrivelled, In a body of seemingly endless depth. Some part of us is heavy and dishevelled, Misery filling an unending breadth.  Some part of us is

 
 
 

2 Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
Arham Bandekar
Arham Bandekar
Dec 18, 2025
Rated 5 out of 5 stars.

Narration 👍

Like

Syntax Player
Syntax Player
Dec 17, 2025
Rated 5 out of 5 stars.

Nice

Like
bottom of page