अस वाटतं एकदा परत तुझ्यावर प्रेम करावं.
By KALPESH SITARAM AHIRRAO
किनारी एका समुद्राच्या रोज रोज बसावे,
रोज नव्या सांजेला फक्त तुलाच पाहावे,
त्या बाकावर फक्त तू आणि मीच असावे,
हातात हात घेऊन तुझ्याच नजरेत बघत रहावे.
आपले नाते,जरी असे अबोल अबोल असावे,
तरी अस वाटतं एकदा परत तुझ्यावर प्रेम करावे.
ओठांवर नेहमी फक्त तुझेच शब्द असावे,
तुझ्यासोबत नेहमी मी असेच चालत रहावे,
पाउलवाटेवर माझ्या फक्त तुझेच पाउल असावे,
आयुष्याच्या क्षितिजापर्यंत तूच सोबत असावे.
आपले नाते,जरी असे अबोल अबोल असावे,
तरी अस वाटतं एकदा परत तुझ्यावर प्रेम करावे.
स्वप्न माझे नेहमी फक्त तुझ्याच मिठीत बघावे,
आसवे माझे सारे नेहमी तुझ्याच हाती मिटावे,
जगणे माझे नेहमी फक्त तुझ्याच श्वासात असावे,
किनारी एका समुद्राच्या रोज रोज बसावे,
हातात हात घेऊन तुझ्या सोबत चालत रहावे.
आपले नाते,जरी असे अबोल अबोल असावे,
तरी अस वाटतं एकदा परत तुझ्यावर प्रेम करावे.
By KALPESH SITARAM AHIRRAO

Comments