''अखेरची रात्र''
तुझ्या रुपात आज मी चंद्र जवळूनी पाहतो.
भास्करा उजाडू नको रे माझा चंद्र हरवून जातो.
चंद्र चांदण्याच्या साक्षीने मिलन आपले व्हावे,
दूर तुझे नगर आता पण जवळ श्वास उरावे.
तू मिठीत माझ्या येता, चंद्र ही ढगा-आड जावा,
लाजून लाल तु व्हावी, मी रंग तुझा पांघरवा.
अखेरचं हे चांदणं, हा चंद्र स्मरणात रहावा.
गंध तूझ्या गात्राचा, माझ्या मनी उरावा.
तन मन अर्पूनी आज, सगळे पाश तुटावे,
बेभान होऊनी दोघं, सोने यौवनाचे लुटावे.
अखेरची ही रात्र, आता जगून घ्यावी,
विरता विरता रात्र, आपली प्रेम कहाणी त्यात विरावी.
By Ganesh Shivaji Marane

Comments