अंधार
By Vikas Rajendra Pisore
प्रकाशाचं दिव्यपुराण
छातीठोकपणे सांगणाऱ्या महात्म्यांनो
उजेडाच्या पखाली अंगावर घेऊन
त्यात काळोखाचं पाणी वाहणाऱ्या
रेड्यांच्या जमाती असतात
तुमच्या माणसा माणसांमध्ये.....
औदार्य चे विदुषी मुखवटे घालुन
त्या आड क्रौर्यतेचा चेहरा लपवणारे
विदुषक ही सापडतील तुम्हाला
तुमच्याच माणसा माणसांमध्ये....
देवळात देवत्वाचा अवतार दाखवुन
गर्भगृहात सैतानाच्या पिलावळी पोसणाऱ्या
जमाती सुद्धा आढळणारं तुम्हाला
तुमच्याच माणसा माणसांमध्ये....
म्हणुन मग प्रश्न उरतो तो केवळ एकच
अंधार कुठं नाही...?
तो शाश्वत आहे
पाताळाच्या क्षणाक्षणात
भुमंडळाच्या कणाकणात
चराचराच्या गणागणात
आणि
माणसांच्या मनामनात
सदैव......
By Vikas Rajendra Pisore

Comments