अंतरीच्या
- Hashtag Kalakar
- Dec 13, 2025
- 1 min read
By Mohini C. Halarnkar
का कोण जाणे आतासे
अबोल व्हावे वाटते l
अंतरीच्या सुरांसंगे
एक व्हावे वाटते l
तो रम्य भूतकाळ
त्याचा आता उपयोग नाही,
कसा असेल भविष्यकाळ
त्याचेही आता आकर्षण नाही l
वेदनांचे बोचणे हे
आता सहवत नाही
संसाराच्या चिंध्या माझ्या
बघता बघता रात्र काही सरत नाही l
अश्रू माझे ठेवून उशाशी
उठते मी रोज सकाळी ,
हासरे माझे ठेवुनी वदन ते
गाते देवा तुझी भूपाळी l
सगळ्यांच्या डोळ्यात मी
एकच तो प्रश्न पाहते,
इतक्या साऱ्या वेदना असूनही
कैसी ही सुखी दाखविते l
का कोण जाणे आतासे
अबोल व्हावे वाटते
अंतरीच्या सुरां संगे
. एक व्हावे वाटते l
By Mohini C. Halarnkar

Comments