- hashtagkalakar
Kolavaree D
By Riyaj Attar
आजपर्यंत लाखों करोडों गाणी लिहिली गेली
ती सुद्धा होती अप्रतिम आणि एकापेक्षा भारी
तरी पण why this kolaavaree ?
रस्यावर, दुकानात, ऑफ़िसमध्ये, हॉटेलमध्ये
गावात, शहरात, परदेशात सर्वांच्या घरोदारी
फ़क्त एकच why this kolaavaree ?
बाळ रडायला लागले की सगळ्यांचाच घाम काढी
पण या गाण्याचे सुर ऐकताच कळी उमले गालावरी
कमाल आहे why this kolaavaree ?
कवीता म्हणुन दाखव म्हटले की मुले त्रागा करी
पण हे गीत न सांगताच एक सुरात गाती मुले सारी
न चुकता why this kolaavaree ?
कॉलेजमध्ये इंग्रजीच्या क्लासला सगळेच दांड्या मारी
पण या गाण्यासाठी कँटीन मध्ये सर्वांना गोळा करी
वन्स मोर why this kolaavaree ?
नीट दिसेना की नीट ऐकु येईना ओलांडली वयाची सत्तरी
पण हे गाणं सुरु होताच आजोबा ही टिव्ही कडे मान करी
अस्पष्टपणे why this kolaavaree ?
By Riyaj Attar