top of page

नाळ

By Amey Sachin Joag



रूप तव ऐसे मनोहारि जणू नक्षत्रांची माळ

बंध जुळले असे जणु की युगायुगांची नाळ ||धृ||


तुझ्या लोचनी प्रिये दिसती स्वर्गाची ग दारे

तुझियाविना रितेच राहती सारे हे देव्हारे

सदन सजवे, बागही फुलवे हास्य तुझे मधाळ

बंध जुळले असे जणु की युगायुगांची नाळ ||१||


गुलाबासही तव रूपाचा हेवा वाटावा

रातराणीच्याही देही तव गंध दाटावा

खुळा पाय मोगऱ्याचा तवपाठी ओढाळ

बंध जुळले असे जणु की युगायुगांची नाळ ||२||





साक्षीस ठेवून चंद्राला त्या शपथ घेइ चांदणे

पृथ्वीवरती होऊन असले नक्षत्र नांदणे

तेव्हापासून निरभ्र झाले आयुष्य मेघाळ

बंध जुळले असे जणु की युगायुगांची नाळ ||३||


तुझ्या आठवांनी ग शिंपते अंगण मातीचे

नयनदीप तुझे उजळविती घरकुल रातीचे

तुझ्या मार्दवी स्वराने होई सारे घर घायाळ

बंध जुळले असे जणु की युगायुगांची नाळ ||४||


By Amey Sachin Joag





Recent Posts

See All
सोच रही होगी तुम ऐसा

By Surjeet Prajapati सोच रही होगी तुम ऐसा मैं जी लूंगा तुमसे बिछड़ के पर सोचा मैं न हूँ वैसा आवारा दिल है मेरा हटके जी ना पाऊँगा मैं बिछड़...

 
 
 
मेरे मौला इतना सा कर दे

By Surjeet Prajapati मेरे मौला इतना सा कर दे जो कटे, संग उसके सफर दे….…  गलतियाँ तू मेरी माफ कर दे, बस सके, संग उसके तू घर दे… .  मेरे...

 
 
 
Aasmaan Mein Kya Hua

By Bhavya Jain Theme= A boy is in love with a girl whom he sees now almost everywhere , but the twist is he is not sure if she is a real...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page