कैद
- Hashtag Kalakar
- Mar 24, 2023
- 2 min read
By Chetan Jagdish Soshte
रक्ताने हात माझे बरबटलेत,
होय मीच खुनी आहे,
एक नाही तर चार खुन मी केलेत,
माझ्या अपेक्षा,स्वप्न, जिद्द आणि
माझ्यातल्या कलेचा सुद्धा मी मुडदा पाडलाय.
रक्त बंबाळ झालेली माझी पांढरीशुभ्र,
कारकीर्द आज मीच संपवतोय.
बेरोजगारीच्या धारदार चाकूने,
एक-एक अवयव कापून वेगळा केलाय,
नात्यांच्या गर्दीला हेलपटून आज,
लालबुंद डोळ्यांनी भुतकाळात केलेल्या चुकांची,
मुद्दल भरतोय अश्रुंच्या व्याजासकट.
रोज स्वतःला हरतांना बघतोय विचारांच्या लढाईमध्ये,
काळजात प्रेमाला आता थाराच नाही दिला,
विकून टाकली ती प्रेमभंग जात माणुसकीच्या खोट्या बाजारात,
कारण बेईमान दुनियेत दु:खाची किंमत नाही.
रक्ताने बरबटलेले हात घेऊन अनेक दारं ठोठावली,
फक्त मदतीच्या आशेने,
माणुसकीचं प्रदर्शन करणार्या एकानेही त्यावर,
मायेची फुंकर नाही घातली.
उलट खुनी म्हणून मला ,
एकलकोंड्यांच्या त्या कोर्टात उभं केला,
जिथे मला शिक्षा भेटली,
ती पण कैद,
फक्त आजन्म कारावासाची...

Comments