तू
By Dhiraj Phadke
तुज मनीचा थांग नाही
अंतरी आभास नाही
तहान तुझी, शीण जीवी
जणू चातकाला पावसाची..
कवडसा हरवलेला
हुंदक्यांनी गुंतलेला
झेलते मी प्राण माझा
त्या क्षणा..
परी तू का सोडून चालला ?
रंग-गंध एक होते
ऋणानुबंध एक होते
तरी आज का हे सारे विखुरले ?
काळ असता हा वसंती
शुष्क पर्ण तरुवरती
का उडुनी चालला खगांचा काफिला ?
परी तू का सोडून चालला ?
एकदा ऐक माझे
मिटुनी जातील हे दुरावे
कोंडमारे झोंबणारे
उत्तरांती प्रश्न आले..
आठवे तुझीच येती
आसवे मग तरळती
तरी का न हरपे तुज मनी संवेदना ?
पापण्यांचा इशारा
अंतरीचा शहारा
चालता आज तू कसे विसरला ?
परी तू का सोडून चालला ?
By Dhiraj Phadke

Comments