घर
By Dhiraj Phadke
हास्याच्या गुलालात,
सुख-दुःखाच्या सानिध्यात,
मानवाला आश्रय देतं,
असं ते 'घर'
भावाची दादागिरी,
बहीण माहेरघरी,
आई-वडील करारी,
असती कोठे ?
अंगणात वृंदावन,
पलीकडे ती विहीर,
स्वतंत्र देवघर,
असते कोठे ?
नारळ-सुपारी,
आंबा परसदारी,,
फणस वेशीवर
असतो कोठे ?
स्वयंपाकाची ती चूल,
तेवतसे सालोसाल,
पाहुण्यांची वर्दळ,
असते कोठे ?
गाईचं वासरू,
कुत्र्याचं पिल्लू,
पोपट विठू विठू,
असतो कोठे ?
गाव असो वा शहर,
सासर अथवा माहेर,
एक स्वरूप-आकार,
असतो कोठे ?
वैरभाव नसे जेथे,
विषमता मान्य नसे,
लक्ष्मी ही तेथेच,
नांदतस।
By Dhiraj Phadke

Comments