हात फक्त तुझाच हाती
- Hashtag Kalakar
- Oct 16
- 1 min read
By Miss. Swarupa Deepak Mule
मनाने टाळण्याचे ; केले शेकडो बहाणे ।
नशिबी होतेच तरी ; तुझ्यावर भाळणे ॥१॥
दमले जेव्हा एकदा ; काढूनी ते पळ ।
मेंदूच्या नकारात अडकलाच ; मनाच्या होकाराचा गळ ॥२॥
विचारांच्या बागेत उगवले ; एक अल्लड स्वप्न ।
तुझ्या सोबतीत झाले ; दिन-रात्र मग्न ॥३॥
ऐन शरदात जणू ; फुटली नवी पालवी ।
प्रेमवर्षेत भिजण्या ; मन हे आर्जवी ॥४॥
जुना जरी दिनक्रम ; विचलित होई लक्ष ।
हा बदलच देतो आहे ; प्रेमबाधेची साक्ष ॥५॥
आता कशाला आढेवेढे ; कशाला टाळणे ।
हात फक्त तुझाच हाती ; असो किती ही वळणे ॥६॥
By Miss. Swarupa Deepak Mule

Comments