संवाद
By Snehal Santosh Tawate
प्रत्यके नात्यामधला अतुट धागा म्हणजे संवाद,
भौतिक दुरावा असताना नात्यामध्ये कणखरपणा ठेवतो तो असतो संवाद...
कधी तासाभराच्या गप्पा असतो संवाद, तर कधी दोन मिनिटांमध्ये केलेली चौकशी असतो संवाद...
मन मोकळं करण्याचा एक मार्ग असतो संवाद, तर कधी अबोल मनाला डोळ्यातील भावनांनी ओळखतो तो असतो संवाद... हरवलेल्या मनाला शोधताना तर कधी तुटलेल्या नात्याला जोडताना, एक दुवा बनुन काम करतो तो असतो संवाद...
By Snehal Santosh Tawate

Comments