श्वास
By Shubhangi Ashish Deoorkar
उसवून श्वास माझा
तू चांदणे पांघरून गेलीस
तुझ्या स्पदंनात अडकलो मी
तू आयुष्य गंधाळून गेलीस
तुझ्या गोड गुलाबी ओठात
मी असा हरवून गेलो
जळून राख झालेल्या देहात
प्राण फुंकून गेलो
तू अशी धगधगती आग आहेस
पार विझुनी मी गेलो
तुझ्या श्वासात गुंफताना श्वास
मी मलाच विसरून गेलो
By Shubhangi Ashish Deoorkar

Comments