top of page

श्रीकृष्णा तुला यावे लागेल - By Dr Yugandhara Barge

9 minutes ago
3 min read

Written By: Dr Yugandhara Barge

Category: Poetry

Competition: Poetry and Creative Writing Competition 2026

In the vibrant tapestry of the Poetry and Creative Writing Competition 2026 by Hashtag Kalakar, Dr Yugandhara Barge presents "श्रीकृष्णा तुला यावे लागेल," a profound reflection in poetic form. With its rich cultural and philosophical undertones, this work stands out in the poetry category, inviting readers into a contemplative dialogue with Lord Krishna. The poem weaves themes of spirituality, contemporary life challenges, and divine intervention, offering a unique lens on human and divine interactions.

About the Work

Dr Yugandhara Barge's poem captures the essence of a heartfelt plea to Lord Krishna, urging him to return and guide humanity through its trials. The work is imbued with vivid imagery and a rhythmic flow, reflecting on modern dilemmas juxtaposed with mythological references. The tone is both reverent and introspective, crafting a dialogue that questions and seeks wisdom. Through this interaction, the poem subtly encourages readers to reflect on their own spiritual and moral paths.

श्रीकृष्णा तुला यावे लागेल

Original Submission by Dr Yugandhara Barge

*श्रीकृष्णा तूला यावे लागेल*

(अभासी बालहट्टापायी कृष्णास आमंत्रण देण्यास निघालेली मी…)

वृंदावनी, कंदबाखाली

दिसला मला हरी

मेघासारखे निळे अंग,

त्यावरी विजेचा शेला भरजरी

घन दाटले कुरळ्या केसात,

मोरपीस शोभे डोईवरी.

तना मनाला आणि शहारा,

नयनाच्या त्यांच्या श्रावणधारा---

(साक्षात भगवंताला बघून एका सामान्य, संसारी, पामराने विचारावा असाच प्रश्न मी विचारला)

आठ आठ जणींसोबत

कसा रे नांदलास सौख्यभरे?

इथे वाढत चाललेल घटस्फोट,

आणि एकाच लग्नात होतायेत अधमरे

संसार म्हणजे पूरुषत्वाला दिलेला आदर

आणि स्त्रीत्वाचे केलेले कौतुक

समजवायला

माधवा तूला यावे लागेल..

गवळणी आणि राधेसोबत

कित्येक रचल्यास रासलीला

इथे आज मुन्नी, उद्‌या पिंकी

आणि परवा शीला

प्रेम म्हणजे निस्वार्थना

संयम, समर्पण आणि निर्मळता

उमगवायला

राधा रमणा तूला याव लागेल..

भ्राता बलरामाने चालविला नांगर,

साक्षात तू सांभाळल्यास गाई

वांझ झाली आहे रे काळी आई,

आणि कसायाकडे गेली आहे गाई

भूमाता आणि गोमातेच्या रक्षणार्थ

गोपाला तूला याव लागेल…..

पूतनेचे मोहक रूप

यशोदेला नाही ओळखू आले

धाराऊ समजूनन तिला

तूला तिच्याच स्वाधीन केले?

काय सांगू तूला भूलोकीच्या आईची

गड़बड आणि बिगी बिगी

कळतच नाहीये तिला,विष चारतेय पोरांना

झोमॅटो स्विगी आणि मॅगी

दूध, दही लोण्याचे महत्व समजवायला,

माखनचोरा तूला यावे लागेल….

गवळण्यांच्या तक्रारी ऐकून

यशोदेने बांधले होते तुला उखळाला

शांत, स्मित होतास नूसताच,

इजा नाही झाली का रे कोवळ्या अंगाला?

असंयमी,अशांत,उद्धट पिढीला

थोरांचा आदर करायला

शिकवायला तरी

यशोदा वत्सला तूला याव लागेल….

श्रीकृष्ण मिश्कील हसले

मला वाटल अता ने फसले

म्हणाले….

इहलोकीचा एवढाच होतोय त्रास,

तर परलोकी तूला यावे लागेल

झाली ना पंचाईत!

देवा रे देवा

माधवा,मोहना,मधुसूदना…

मला जावे लागेल

शेगडीवर दूध ठेवलय,उतू जायच्या आधी

देवा मला जावे लागेल..

पैठणीची घडी मोडायची राहीलीये

देवा मला जावे लागेल..

फॉरेन टूर करायची राहीलीये, नवरोबांचा विचार बदलायच्या आधी

देवा मला जावे लागेल..

मुलांचे लग्न, नातवंडांची तोंड बघायची राहिली आहेत

देवा मला जावे लागेल..

पुन्हा एक मिश्कील हसू ….

आणि त्यानंतर गहन शांतता

जातीयेस तर जा,पण एक निरोप घेऊन जा

मार्ग मी दाखवणारं…

निवडायचा की नाही तुम्ही ठरवायच आहे

सारथी मी होईल…

पण मार्गस्थ तूम्हालाच व्हायच आहे.

भान राहूद्या काम, क्रोध, लोभ

यांवर नियंत्र‌णाचे

संवर्धन करा या सृष्टीचे

आणि येथील चराचराचे

विसरू नको धर्म,

त्यानुसारच कर आपले कर्म

आज तुझे आहे,ते उद्या तूझे नाही

क्षणिक सूखासाठी कशाला एवढी घाई?

मला यावे लागेल की नाही हे तर काळच ठरवेल -- परंतू

हे उन्मत्त, मदमस्त मानवा

याचा विसर कधीही न व्हावा

एक ना एक दिवस, कधी ना कधीतरी

तूला माझ्याकडेच यावे लागेल.

जय श्रीकृष्ण 🙏🏻

About the Competition

The Poetry and Creative Writing Competition 2026 by Hashtag Kalakar is a prestigious platform that invites participants worldwide to share their creative expressions. Fostering a space for artistic exploration, the competition celebrates diverse voices and themes, providing an opportunity for writers and poets to engage with a global audience. It is a convergence of creativity and culture, where participants can showcase their unique narratives and poetic artistry.

We extend our heartfelt thanks to Dr Yugandhara Barge for her insightful contribution, "श्रीकृष्णा तुला यावे लागेल," to the Poetry and Creative Writing Competition 2026. Her work enriches the tapestry of the competition with its deep spirituality and philosophical reflections. We hope her poetic journey continues to inspire and resonate with readers everywhere.

About Hashtag Kalakar

Hashtag Kalakar is a creative platform dedicated to providing artists, writers, singers and other creative talents with opportunities to showcase their work and reach wider audiences through competitions, features and creative initiatives.

 
 
 

Recent Posts

See All
A Letter to My Younger Self - By FATHIMA RIAZUNISA

Written By: FATHIMA RIAZUNISA Category: Poetry Competition: Poetry and Creative Writing Competition 2026 In the evocative poem "A Letter to My Younger Self," FATHIMA RIAZUNISA takes us on a journey t

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page