वेड्यासारखं प्रेम करतो
By Poonam Subhash Jadhav.
नाही जमणार मला तुला विसरणं,
खूप अवघड होईल मला माझचं सावरणं,
क्षणात तो विचार डोळ्यात पाणी आणतो,
जो मला तुझ्यापासून दूर घेऊन जातो,
तु फक्त माझाचं आहेस फक्त माझा,
हे देवालाही समजून घ्यावचं लागेलं,
नाही राहू शकत मी तुझ्याशिवाय म्हणून,
त्या देवाला तुला मला द्यावचं लागेलं,
नाही गमावू शकत मी तुला,
विचार येताचं मनी झोप नाही लागत मला,
रात्रभर मन बैचेन राहतं,
कळत नाही मला,
आठवणीत तुझ्या कधी ते झोपून जातं,
तुला बघितल्यावर मला एक वेगळाच आनंद मिळतो,
खरचं मी तुझ्यावर वेड्यासारखं प्रेम करतो...
By Poonam Subhash Jadhav.

Comments