वाहली अखंड धारा
- Hashtag Kalakar
- May 11, 2023
- 1 min read
By Nikhil Datar
वाहली अखंड धारा वढू संगमास रुधिराची स्मरु दिव्य धर्म गाथा मृत्युंजय शिवतनयाची...धृ
ही निबिड अरण्य वने कशी जाहली फितूर? वतनास हपापली मने वागली कशी हो क्रूर? जाणू अगम्य महती कसब्याच्या संग्रामाची स्मरु दिव्य धर्म गाथा मृत्युंजय शिवतनयाची...१
या सह्यनभी अकस्मात का शंभूसूर्य पारखा होई? या स्वराज्य गाभाऱ्यात का शिवपुत्र शापित राही? मेळवू एक एक पाईक शपथ तुम्हा भगव्याची स्मरु दिव्य धर्म गाथा मृत्युंजय शिवतनयाची...२
ते शंभू मनीचे अतिरण समजू शकेल जो कोणी उमगेल त्यास शिकवण जी यमही झुकवी चरणी जीव धन्य ज्यास उमगली व्यथा चाळीस दिनांची स्मरु दिव्य धर्म गाथा मृत्युंजय शिवतनयाची...३
...२
...२...
लावू ललाटी ही माती सांडले जिथे शंभू रक्त रक्ताने प्रज्वलित वाती पथ उजाळती विजयंत जागवू समस्त जनमन ही वेळ दृढ संकल्पाची स्मरु दिव्य धर्म गाथा मृत्युंजय शिवतनयाची...४
जे जे निष्ठ ते तन मन वढू तुळापुरास विलसे ते व्यर्थ अवघे जीवन शिवमंत्र जिथे ना वसे मी निमित्त मात्र अंबे दे शिवदृष्टी सव्यसाची स्मरु दिव्य धर्म गाथा मृत्युंजय शिवतनयाची...५
By Nikhil Datar

Comments