top of page

वारसा

Nov 24, 2022
2 min read

By Namrata Vimalchandra Kaslay


पाहिले नाही तुला कधी मी

पण तरी तुझी आठवण आहे

आई च्या डोळ्यात आणि शब्दात

तुझे अस्तित्व दडले आहे

शांत समंजस समजूतदार

प्रेमळ लाघवी अन् मनमिळाऊ

हसरी मृदुभाषी पण शिस्तप्रिय

अनेक रुपं तुझी जाणली आहे

आणि प्रत्येक रूपात मला तू

शक्तीच प्रतीक च वाटली आहे

संसाराचा गाडा गेला असता

अनेक खाच खळग्यातुन

प्रसंगी सारथी बनून

योग्य मार्ग निवडला आहे

तर

प्रसंगी गणिततज्ञ बनून

हिशोबाची गणित

चुटकी सरशी सोडवली आहे


महत्व जाणून शिक्षणाचे

आपल्या मुलांना अन मुलींना देखील

उच्चं शिक्षित बनवलं आहे

आणि त्या सर्वाना आपल्या

स्वकर्तृत्वावर जगायला शिकवलं आहे


आपल्या मायेने सर्वाना

संपूर्ण कुटुंबाला

बांधून ठेवलं आहे

आणि घरच्या बरोबर

बाहेरच्यांना हि आपलंस केलं आहे


तुझ्या दारी येणारा कधी

रिकाम्या हाती गेला नाही

गरजवंताला नेहमी

मदत केली आहे

माणसा प्रमाणेच प्राण्यांना हि

तू खूप जीव लावला आहे



आपली सर्व कर्तव्य

योग्य रित्या पार पाडून

आता तू कर्तव्य मुक्त झाली आहे

आणि आपल्या मुलामुलींना

संस्कारांची शिदोरी अन

माया आणि ममतेचा वारसा देऊन

संसार थाटून दिला आहे





तुझा वारसा घेऊन आईने

तिच्या संसाराला सुरवात केली

आणि माहेरच शेंडेफळ असणारी ती

सासरी थोरली सून झाली


तिनेहि अगदी उत्तम रित्या

आपली कर्तव्य पार पाडली

तुझाच वारसा चालवत

सर्वांची लाडकी ती झाली


तिच्या निखळ हसण्याने

घरभर आनंद पसरला

आणि तिचा संसार

गोड असा फुलला


संसाराच्या या वेलीवर

फुलं येण्याची चाहूल लागली

आणि सर्व मंडळी

अजूनच हर्षोलासित झाली



अनेक यातना सोसून

आईने मला जीवन दिलं

आणि

जन्म घेऊनि तिच्या पोटी

मला भाग्य मिळालं


तुझ्या भेटी साठी

मला घेऊन ती निघाली

पण

नुकतीच आई बनलेली ती

तिच्या आईला कायमची

गमवून बसली




एका हाती होतं तिच्या

आई होण्याच सुख

अन

दुसऱ्या हाती मिळालं तिला

आईला गमवण्याच दुःख


सर्व दुःख सारून ती

खंबीर पणे उभी राहिली

आणि माझ्या मध्ये

तुला कायम शोधात राहिली


माझी आई आता

माझी जवळची मैत्रीण झाली

खूप गप्पा मारून सुद्धा

आमची हौस काही नाही भागली


दिवसा मागून दिवस जात होते

आई आणि मी आता

अजून घट्ट

मैत्रिणी झालो


तुझी आठवण नेहमी ती

अश्रू गाळत काढत राहायची

तिला रडताना बघून मात्र

माझी हालत खराब व्हायची


ती मला नेहमी म्हणायची

माझी आईच माझ्या

जवळ परत आली

पण तरी देखील मला

तुझ्या कडे खूप तक्रार

आईला रडवण्यासाठी

करावीशी वाटली


तिच वाक्य आठवत मला

जेव्हा तू आई होशील

या सर्व भावना अनुभवशील

तेव्हा तुला कळेल


पण अचानक माझा हात सोडून

माझी आई माझी मैत्रीण

मला कायमची सोडून गेली



तिला रागवायचं आहे मला आता

का मला एकटी ला सोडून गेली

तुझ्या जवळ तर मी होते

मला तर कोणीच नाही


आता तुझ्याकडे माझा

वारसा मागते

अन

मला तो हवा आहे

आणि माझी मुलगी बनून

तुला परत यायचं आहे


By Namrata Vimalchandra Kaslay






Recent Posts

See All
Mirrored Truth

By Rufaida Manzoor I stood beside the silent lake, With eyes that felt no urge to break. My hair fell low in shadows deep, The waters...

 
 
 
My Antidote

By Anveeksha Reddy You fill my books with your ink, seeping into the pages bright and brilliant The words etched into the cracks of it,...

 
 
 
Avarice

By Anveeksha Reddy You tear my skin and pick on my bones I label it as gluttony for you Churning and shattering the remains of my...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page