वातावरण पावसाळी होतं
- Hashtag Kalakar
- May 8, 2023
- 1 min read
By Omkar Mohile
वातावरण पावसाळी होतं, तिचा हात हातात होता
दोघात एकच छत्री होती, मना प्रेमाचा ओलावा होता
मधूनच नजरानजर होत होती, ती हलकेच तेव्हा लाजत होती
पाऊस हलकेच पडत होता, पाने हलकेच झुलत होती
रस्ता सारा ओला होता, नदीही पावसात भिजत होती
दोघात एकच गाणं होतं, मनात एकच भावना होती
अचानक वीज चमकली होती, ती येऊन मला बिलगली होती
माझ्या मनातली ती सर, माझ्या मिठीत विसावली होती
तसाच पाऊस पडत होता, आम्हीही तसेच उभे होतो
पावसाच्या थेंबांमध्ये, दोन चिंब मने भिजत होती
By Omkar Mohile

Comments