राहिला पाऊस आठवांचा
- Hashtag Kalakar
- Sep 8, 2023
- 1 min read
Updated: Sep 2
By Shital Rahul Dusane
आठवतो का तुला, तो पाऊस चिंब भरल्या मनाचा
तुझ्या कवेत हरवून गेले, उद्रेक होता भावनांचा
अधीर ओठांना भेटता ओठ, खुलला गुलाब प्रीतीचा
तारुण्य सरले आता , राहिला फक्त पाऊस आठवांचा
हातात हात गुंफुनी ,हट्ट तुझा, एका छत्रीत चालण्याचा
लबाड पाऊस,भिजवी मनाला, भोवती सुंगध मातीचा
लाजेने लाल चेहरा माझा,उजळून टाके प्रकाश विजेचा
चेहरा आता सुरुकुतलेला,राहिला फक्त पाऊस आठवांचा
आज ही स्पर्श ताजा आहे , दोन मनानी एक होण्याचा
देह जीर्ण झाला जरी, मनी सुवास,जुन्या मोगऱ्याचा
मौनातुनी सवांद सारा, खेळ चालला होता, दोन नजरांचा
स्पर्शास त्या कंपणे आली,राहिला फक्त पाऊस आठवांचा
By Shital Rahul Dusane

Comments