राम-भजन
- Hashtag Kalakar
- May 8, 2023
- 1 min read
By Omkar Mohile
भजा हो राम-राम दिनरात,
भवकानन हे पार कराया
सोपी सुलभ ही वाट ।।धृ।।
रघुकुलवंशज दशरथनंदन,
जानकीवल्लभ प्रभो प्रभंजन ।
राघव नरहरी नरवर उत्तम,
हाचि त्रैलोक्यात ।।१।।
भजा हो....
स्थिरचलव्यापक सृष्टीपालक,
खलसंहारक दुरित निवारक ।
रामनाम हे वदता वाचे,
प्रकटे निमिषार्धात ।।२।।
भजा हो....
राम नाम हे सोपे सुंदर,
दूर सारिती अवघे अडसर ।
म्हणुनि ध्यानी स्मरे निरंतर,
शंभो पशुपतिनाथ ।।३।।
भजा हो....
राम स्मरा हो राम जपा हो,
रामाचा तुम्ही ध्यास धरा हो ।
शांती मोद अन् मोक्षप्रदाता,
राममंत्र साक्षात ।।४।।
भजा हो राम-राम दिनरात...
By Omkar Mohile

Comments