top of page

रंगांआडचा चेहरा - By Suhas Lahurikar

3 days ago
2 min read

Written By: Suhas Lahurikar

Category: Poetry

Competition: Poetry and Creative Writing Competition 2026

Suhas Lahurikar presents "रंगांआडचा चेहरा," a poignant entry in the poetry category of the Poetry and Creative Writing Competition 2026. This evocative piece delves into the complexities of identity and self-discovery, inviting readers to reflect on the masks they wear and the true selves hidden beneath. Through its thoughtful verses, the poem resonates deeply, offering a window into the universal human experience.

About the Work

In "रंगांआडचा चेहरा," Suhas Lahurikar crafts a narrative that is both introspective and universal. The poem explores themes of identity and the dichotomy between public personas and inner truths. With vivid imagery and a reflective tone, it poses profound questions about existence and self-awareness, encouraging readers to ponder their own journeys of self-discovery.

रंगांआडचा चेहरा

Original Submission by Suhas Lahurikar

कवितेचे शिर्षक: रंगांआडचा चेहरा

मी नाही यातला, मी नाही त्यातला…

मी आहे तरी कश्यातला?

मी हे करत नाही,मी ते करत नाही…

मी फक्त लोकांना हसवतो.

पण त्या हसण्यामागे

कितीतरी न बोललेले प्रश्न आहेत...

मी आहे कोण? माझं अस्तित्व काय?

मी सर्कशीतले प्रत्येक खेळ करतो,

प्रकाशझोतात उभा राहतो,

चेहऱ्यावर रंग चढवतो,

आणि स्वतःला विसरून

एक नवी भूमिका जगतो.

लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणणं

हीच माझी ओळख बनली...

मी ती व्यक्ती, जी लोकांना हसवते!

पण प्रश्न तोच-"मी काय करतो?"

मी रंगवतो चेहऱ्यावर हसू,

पण डोळ्यांतले प्रश्न लपवत असतो.

मी टाळ्यांच्या गजरात उभा असतो,

पण टाळ्या थांबल्यावरच्या शांततेत

स्वतःलाच शोधत असतो.

लोक म्हणतात, "हा विनोद करतो."

पण कुणी विचारत नाही-"हा जगतो कसा?"

ज्या हातांनी लोकांचे अश्रू पुसले,

त्याच हातांनी स्वतःचे अश्रू कितीतरी वेळा लपवले.

हसणं माझा व्यवसाय असेल,

पण माझं अस्तित्व त्याहून कितीतरी मोठं आहे.

कारण मी फक्त हसवणारा चेहरा नाही,

मी त्या मुखवट्यामागचा माणूस आहे.

म्हणून आज मी स्वतःलाच विचारतो-

मी टाळ्यांचा आवाज आहे?

की त्या आवाजानंतरची शांतता?

मी जोकर आहे...

की मुखवट्यामागचा माणूस?

मी रंग आहे?

की त्या रंगांआड लपलेली वेदना?

मी नाही यातला,मी नाही त्यातला…

मग मी आहे तरी कश्यातला?

कदाचित,माझं काम लोकांना हसवणं असेल,

पण माझा प्रवास स्वतःला शोधण्याचा आहे.

आणि तो प्रश्न अजूनही तसाच आहे-

मी आहे तरी कोण?

About the Competition

The Poetry and Creative Writing Competition 2026 by Hashtag Kalakar is a prestigious platform for writers and poets to showcase their talent and creativity. It celebrates diverse voices and artistic expression, fostering a community of literary enthusiasts. The competition invites participants to share their unique perspectives through poetry and creative writing.

We extend our heartfelt thanks to Suhas Lahurikar for sharing "रंगांआडचा चेहरा" with us. This thought-provoking poem enriches the Poetry and Creative Writing Competition 2026 with its profound insights and emotional depth. We appreciate Suhas's contribution and look forward to witnessing more of his creative work in the future.

About Hashtag Kalakar

Hashtag Kalakar is a creative platform dedicated to providing artists, writers, singers and other creative talents with opportunities to showcase their work and reach wider audiences through competitions, features and creative initiatives.

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page