मैफिल
- Hashtag Kalakar
- May 8, 2023
- 1 min read
By Omkar Mohile
पहिलीच ओळ झाली, मी थांबलो जरासा
इतक्यात दाद आली, की, क्या बात हैं
भिडली मनात खोल, शब्दांमधील ओल
आला आवाज तेव्हा, की, क्या बात हैं
आधी अनेकादा मी, म्हटला असेल शेर
पण आनंद आजचा, की, क्या बात हैं
होती तशीच गर्दी, ओलावल्या मनांची
मैफिल अशी सजली, की, क्या बात हैं
येऊन ती समोर, बसली पुढ्यात माझ्या
मी म्हटली पुढली ओळ, की, क्या बात हैं
हसली हळुच गाली, कळले जणू तिलाही
ती नजरेतूनी म्हणाली, की, क्या बात हैं
By Omkar Mohile

Comments