मैफिल
By Minal
माझ्याच या मैफिलीत शब्दहीन संवाद माझे
अंधारलेल्या वाटांनी धरलेले बोट चांदण्याचे
तो गडद होतोय आभाळ अन कष्टाच्या छटा धूसर
अलगद वळला दिस हा आजचाही त्या कुशीवर.
तिथे निजली ती कळी होऊन,
इथे गंध चाफ्याचा फिका झाला,
कुठे रातराणीचा रंग उजाडला ?
प्रश्न सारे सावरून गेले
मग कळले उत्तरांचा किनार गाठण्याचा ,
अट्टहास व्यर्थ होता.
पण शून्य झाले कल्लोळ मनातले ?
आता दिस उजाडेल ही केव्हातरी
पण या अंधाराची मुळी भयच न उरले.
माझ्या या मैफिलीचे
कदाचित ,
सुर समंजस झाले????
By Minal

Comments