top of page

माहीम चा चाचू - By Sanjay Padmakar Kulkarni

Aug 17
6 min read

Updated: 14 hours ago

Written By: Sanjay Padmakar Kulkarni

Category: Short Story

Competition: Poetry and Creative Writing Competition 2026

In "माहीम चा चाचू," Sanjay Padmakar Kulkarni, writing as Mahim Cha Chachu, brings to life the essence of Mumbai's local trains through a compelling short story. Participating in the Poetry and Creative Writing Competition 2026, this piece captures the intricacies of human bonds formed in the bustling environment of public transit. Set against the backdrop of a post-COVID world, it reflects on connections and resilience amidst the city's vibrant lifeline.

About the Work

The narrative beautifully encapsulates the theme of unexpected friendships and human resilience within the chaos of Mumbai's local trains. Kulkarni’s storytelling weaves vivid imagery and emotional depth, focusing on the protagonist's bond with a fellow passenger. The story highlights themes of camaraderie and the subtle yet profound impact of everyday encounters on our lives.

Mahim Cha Chachu

Original Submission by Sanjay Padmakar Kulkarni


मुंबई लोकल .....आमची lifeline ...जीवन रेषा ..जगण्यासाठी आधार देताना अनेक अनामिक नात्यानं जोडणारी एक साखळी .. एका वाचनात आलेल्या मुंबई च्या लोकल ट्रेन वरील कवितेच्या खालील ओळी लोकल ट्रेन चे अगदी समर्पक वर्णन करतात

"बस , टॅक्सी,कार सोडा विसरून जाल aeroplane ,

अहो एकदा तरी अनुभवा आमच्या मुंबई ची लोकल ट्रेन ,

या लोकल ट्रेन मध्ये कोणते रंग नसतात, संपूर्ण आयुष्याची चित्र इथे दिसतात ,

रागीट डोळे लालेलाल, प्रेम गुलाबी हसरे गाल ,

कोणामध्ये हिरवी माया, कोणा मध्ये काळी छाया ,

कोणाच्या डोळ्यात pleasure दिसते तर कोणाच्या डोळ्यात pain ,

एकदा तरी अनुभवा आमच्या मुंबई ची लोकल ट्रेन "


मार्च २०२० मध्ये covid मुळे लोकल प्रवासावर लावण्यात आलेले निर्बंध एका प्रदीर्घ कालावधीनंतर म्हणजे तब्बल २ वर्षांनी उठवण्यात आले आणि साधारणतः एप्रिल २०२२ पासून लोकल प्रवास विनाअट सर्व सामान्यांसाठी खुला करण्यात आला. लोकल प्रवास करण्यासाठी पुन्हा तिकीट खिडकीवर लांबच लांब रांगा दिसू लागल्या आणि स्टेशन्स व प्लॅटफॉर्म पुन्हा प्रवाश्यानी गजबजू लागले. या आधीच म्हटल्याप्रमाणे लोकल हा अनामिक नात्यांना जोडणारा एक दुवा आहे, एक साखळी आहे. रोज रोज एकाच मार्गावर एकाच वेळी एकाच गाडीने व एकाच डब्यात प्रवास करणारे अनेक आपणास भेटतील. जागेसाठी स्थानकात प्रवेश करणाऱ्या लोकल ट्रेन वर तुटून पडणाऱ्या मुंबईकरांचा आवेश गनिमांवर तुटून पडणाऱ्या मावळ्यांपेक्षा खचितही कमी नसतो. दादर , कुर्ला या सारख्या स्थानकावर लोकल मधून उतरू इच्छिणाऱ्या प्रवाशांना उतरू न देता आग्रहाने पुढच्या स्थानकापर्यंत जबरदस्तीने नेणाऱ्या मुंबईकरांचे आदरतिथ्य निश्चितच वाखाणण्याजोगे आहे 🤣🤣🤣. मात्र एकदा का जागेवर स्थिरावले कि मग मात्र रोज रोज दिसणारे चेहरे ओळखीचे होतात , हळू हळू चेहर्या वर हास्य फुलतात , नकळत अभिवादनासाठी हात वर जातात आणि रंगते गप्पाची मैफिल ...नाव गाव काहीच माहित नसते , मुळात गरजच नाही भासत हो पण एक अनोळख्या दोस्ती ची सुरवात मात्र झालेली असते. मग काय एकमेकास आलटून पालटून जागा देणे ,बाकावर चौथी जागा निर्माण करणे इतपत माणुसकी ची देवाण घेवाण ही सुरु होते. कुठल्या हि विषयावर गप्पा ,चर्चा गाणी , भजन इत्यादी च्या माध्यमातून जीवनाचे सारे तत्वज्ञान या प्रवासात आपणास प्राप्त होते.

मुंबई ....कॉर्पोरेट नगरी, जबाबदाऱ्या मोठ्या , कामाचा तणाव प्रचंड, घरची मंडळी गावाकडे , त्यांची जबाबदारी , अपेक्षा पूर्तीचे ओझे , टार्गेट पूर्ण करण्याची ओढाताण ....मुंबईकरांचा जीव रोज अगदी मेटाकुटीला येतो...पण लोकल प्रवसातील ही अनामिक नातेवाईक मंडळी भेटताच क्षणभर का होईना सगळ्या शारीरिक व मानसिक तणावाचा विसर पडतो. ...जगण्याची नवी उमेद येते....उगाचच नाही लोकल ला मुंबईकरांची लाईफलाईन म्हणत.

मात्र मार्च २०२० नंतर Covid च्या जीवघेण्या साथीमुळे हि सर्व नातेवाईक मंडळी अचानक पणे एकमेकांपासून दुरावली होती.....नाती अनामिक ...ना कोणाचा मोबाईल नंबर ना कोणाचा पत्ता ना कोणाचे नाव माहिती.....तरी हि नाती अतूट .......थोडे अजब वाटते ना ....पण खरे आहे.....मायानगरातील नाती बहुधा अशीच असावीत.

मी सुध्दा अर्थातच या लाईफलाईन चा एक भाग, या साखळीची ची एक कडी..वांद्रे येथे स्थित कार्यालयात जाण्यासाठी माझ्या लोकल प्रवास ठरलेला. वडाळा रोड स्थानकावरून सकाळी ९ वाजेची अंधेरी लोकल पकडून वांद्रे येथे जाणे हा माझा नित्यक्रम. आणि याच प्रवासात साधारणतः ७० ते ७५ वर्षाचे असणारे एक वयोवृद्ध पण शारीरिक दृष्ट्या एकदम फिट असणारे एक सद्गृहस्थ माझे अनामिक व अनोळखी मित्र झाले.

आयुष्यात आपणास अनेक व्यक्ती भेटतात, काही आपणास ठराविक वैशिष्ट्यांमुळे कायमस्वरूपी स्मरणात राहतात. अशा व्यक्तींची एक छाप आपल्या मनावर कायम स्वरूपी उमटते. आणि अशा व्यक्तींना एक टोपणनाव देणे हा माझा एक जगावेगळा छंद आहे. ते नाव मी त्या व्यक्तीच्या स्वभाव वैशिष्ट्याला अनुसरून किंवा काही ठराविक वेगळेपणामुळे त्या अनुरूप देत असतो आणि हि सर्व प्रक्रिया अत्यंत उत्स्फूर्त (sponteneous )असते. हे टोपणनाव अत्यंत गोपनीय व फक्त माझ्यापुरता मर्यादित असते ते बाह्य जगाला ज्ञात नसते. असो तर या माझ्या सवयीला किंवा छंदाला अनुसरून मी या अनोळखी मित्राचे नाव ठेवले होते माहीम चा चाचू.

माझा प्रवास वडाळा रोड स्थानकापासून सुरु होत असे, चाचू मात्र आधीच्या स्थानकापासूनच ट्रेन मध्ये बसलेले असत. चाचू खिडकीजवळ, मधली जागा फक्त रिकामी आणि ३ऱ्या सीट वर नेहमीप्रमाणे बंबैय्या स्टाईल एक प्रवासी बसलेला. फर्स्ट क्लास च्या प्रवाशांची मोठी गम्मत असते, एकवेळ उभे राहतील मात्र मधल्या सीट वर नाही बसणार. मी पण त्याला अपवाद नाही पण इतरत्र जागा नसल्याने मी मुकाटयाने चाचू शेजारी बसत असे आणि चाचू पटकन थोडे सरकून हसतमुखाने जागा करून देत.चाचू ना माहीम ला उतरायचे असल्याने मी सुध्दा थोडे मागे सरकून त्याना जाण्यासाठी जागा करून देत असे. चाचू उतरताना सुध्दा हसतमुखाने थँक यु म्हणत मार्गस्थ होत असत.ह्या प्रेमळ स्वभावामुळे चाचू पटकन माझे मित्र झाले व मी आवर्जून त्यांच्या शेजारी बसू लागलो. ह्या मुळे नकळत माझ्या दिवसाची सुरुवात ही चांगली होऊ लागली.

सर्व काही सुरळीत सुरु असताना अचानक Covid चे संकट उद्भवले आणि काही कळायच्या आधीच आपल्या देशात lockdown ची घोषणा झाली. सर्व व्यवहार,दळणवळण व वाहतूक पूर्णपणे बंद झाले व त्या अनुषंगाने मुंबई ची लोकल सुद्धा. मी पण ३ महिने घरूनच म्हणजे वर्क फ्रॉम होम केले मात्र नंतर जून २०२० पासून हळूहळू कार्यालय सुरु झाले . सुरुवातीला रिक्षा ने प्रवास करत ऑफिस ला जाऊ लागलो मात्र नंतर लवकरच लोकल प्रवासाची परवानगी मिळाली. पहिल्याच दिवशी वडाळा रोड स्थानकांतून लोकल मध्ये बसताना नकळत चाचू च्या सीट कडे नजर गेली, मात्र ते रिकामे होते अर्थातच लोकल प्रवास सामान्य जनतेसाठी खुला नसल्याने लोकल अर्थातच खूपच रिकामी होती मात्र मी चाचू च्या आठवणी व स्नेहापोटी त्याच मधल्या सीट वर बसलो.

जवळ जवळ ६ महिन्यानंतर आज लोकल प्रवास करत होतो , एऱहवी मागील सहा महिन्यात चाचू ची फारशी आठवण नव्हती आली मात्र आज चाचू ची रिकामी सीट प्रकर्षाने त्यांच्या अनुपस्थितीची जाणीव करून देत होती. सप्टेंबर २०२० चा तो महिना होता. माझे जीवन गाणे अविरत सुरु होते व त्या सोबत लोकल प्रवास ही. लोकल प्रवसात चाचू ची कमी ही रोज जाणवत होती. Covid ची पहिली लाट ओसरल्यानंतर काळानंतरने दुसरी व तिसरी ही लाट येऊन गेली. अजून ही लोकल प्रवासावरील निर्बंध कायम असल्याने अर्थातच चाचू ची भेट अपेक्षित नव्हतीच.

Covid ची २री लाट अत्यंत जीवघेणी ठरली. औषधी,ऑक्सिजन व बेड ची कमतरता या मुळे अनेक परिचितांना आपले प्राण गमवावे लागले. अनेक कटू अनुभव या काळात सगळ्यांना आले, औषधांचा काळाबाजार आणि हॉस्पिटल ची आवाक्याबाहेरची बिलं यामुळे माणसाचा माणुसकीवरील विश्वास उडाला. मात्र या कठीण प्रसंगातही चाचू चे स्मितहास्य नकळत डोळ्यापुढे यायचे आणि सर्व चांगले होईल हा विश्वास दृढ व्हायचा , मात्र एकदा अचानक वयोवृद्ध चाचू चे या जीवघेण्या संकटात काही बरेवाईट तर नाही ना झाले या विचाराने काळजात चर्रर्र झाले पण पटकन मी तो वाईट विचार मनातून काढून टाकत चाचू च्या निरोगी व दिर्घआयुष्यासाठी सिद्धिविनायकाला साकडे घातले.....एका अनामिक अनोळखी मित्रासाठी ...कुठलाही संवाद नाही साधे नाव सुद्धा माहित नाही पण जुळलेला ऋणानुबंध केवळ एका स्मितहास्यामुळे....ही सगळी मुंबईच्या लोकल ट्रेन ची करामत , नुसतीच करामत नव्हे तर या धकाधकीच्या व तणावपूर्ण जीवनातही लोकल ने घडवलेले संस्कार म्हणू या आपणं.

Covid ची २ री व कालांतराने ३री लाट ओसरल्यानंतर मुंबई चे जीवन बऱ्यापैकी रुळावर आले होते . माझा नित्यक्रम पूर्वी सारखाच सुरु होता. चाचू ची पुन्हा भेट होणार नाही असा विचार मनात आल्याने ते असतील तिथे सुखी राहोत असा विचार करून व मनोमन त्यांना सदिच्छा देऊन मी मार्गक्रमण करत होतो. साधारणतः एप्रिल २०२२ ला लोकल प्रवासावरील सर्व निर्बंध उठवले गेले व ही लाईफलाईन पुन्हा भरगच्चं भरून वाहू लागली. असाच एकेदिवशी मी वडाळा रोड स्थानकावरून लोकल मध्ये चढलो, जागे साठी सर्वत्र नजर भिरभिरली आणि पाहतो तर काय साक्षात चाचू ....हो चाचू च ....वही अदा...वही अंदाज ..आणि ती च जागा ...खिडकीजवळची . क्षणभर विश्वास बसेना...पुन्हा डोळे विस्फारून पहिले , हो चाचू च ...मनोमनी सिद्धी विनायकाला हात जोडून चाचू सुरक्षित असल्याने देवाचे आभार मानले. चटकन पुढे सरसावून मी चाचू च्या समोर गेलो. चाचू नी माझ्याकडे पाहिले आणि पुन्हा तेच प्रेमळ स्मित हास्य ...मला पाहून झालेला आनंद चाचू च्या चेहऱ्यावर स्पष्ट पणे झळकत होता. त्यांनी पटकन हात वर करून मला अभिवादन केले ...त्यांच्या चेहऱ्यावर वरचे हावभाव जणू मला विचारत होते "कैसे हो बेटा ?"....तो अबोल आणि शब्दांविना झालेला संवाद माझ्या हृदयापर्यंत पोहोचला होता . मी सुद्धा चटकन माझा हात छातीजवळ नेऊन थोडे पुढे झुकून त्यांना मनोमन नमस्कार केला आणि मी मजेत आहे या अर्थी मान डोलावली .लोकल च्या गर्दीत चाचू जवळ जाऊन विचारपूस करणे शक्य नव्हते. पण माझ्या भावना चाचू ना पोहोचल्या, त्यांनी पुन्हा दोन्ही हात वर करून आशीर्वाद दिला. माहीम स्थानक आले व चाचू उतरण्यासाठी जागेवरून उठले . जाताना त्यांनी त्यांचा हात माझ्या खांद्यावर ठेऊन मला थोपटल्यासारखे करून पुन्हा आश्वस्त केले, त्यांच्या डबडबलेल्या डोळ्यातील प्रेमळ भावना मला प्रेमाचा , माणुसकीचा न आटणारा न संपणारा ठेवा कायम स्वरूपी देऊन गेल्या. शब्दांविना झालेला हा संवाद, जीवनाचे तत्वज्ञान , जगण्याचा सार सांगून गेला......आज ही माझा प्रवास सुरूच आहे ..चाचू सोबत .. संवादाविनाच .. मात्र नव्या आत्मविश्वासाने, नव्या जोमाने, नव्या आशेने ......आज ही ती च लोकल तेच सीट आणि तेच चाचू ...


Covid च्या संकटानंतर पुन्हा नव्याने जगण्याची उभारी , उमेद …. म्हणतात ना,


नया कल चौखट पर है आज उस पर एतबाऱ कर ,

कब तक बिते कल मे उलझेगा , चल आज एक नई शुरुवात कर

About the Competition

The Poetry and Creative Writing Competition 2026 by Hashtag Kalakar is a prestigious platform celebrating diverse voices in creative writing. This competition invites participants globally to showcase their literary talents, fostering a community of writers passionate about sharing their stories.

We extend our gratitude to Sanjay Padmakar Kulkarni for contributing his insightful short story "माहीम चा चाचू" to the Poetry and Creative Writing Competition 2026. His work adds a rich layer to the tapestry of narratives exploring human connections within urban life.

About Hashtag Kalakar

Hashtag Kalakar is a creative platform dedicated to providing artists, writers, singers and other creative talents with opportunities to showcase their work and reach wider audiences through competitions, features and creative initiatives.

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page