माझे जीवन
By Sakshi Udhoji
ना आनंद हवाय
ना दुःख हवंय
ना त्रास हवाय
ना सुख हवंय
ना हसायचंय
ना रडायचंय
मला फक्त जीवन जगायचंय
ना नोकरी हवी
ना पैसा हवाय
ना घर हवंय
ना आराम हवाय
मला उडायचंय
प्रत्येक क्षण अनुभवायचाय
मला फक्त जीवन जगायचंय
कीती त्या अपेक्षा
कीती त्या अटी
कीती ती आपली नसलेली
स्वप्ने खोटी
कधी पर्यंत असं हे सगळं? असं विचारायचंय
मलाफक्तजीवनजगायचंय
By Sakshi Udhoji

Comments