मा, तूच माझी जनाई; आता तुझ्याच नजरेनं पाहीन हे जग! - By Dr Sanjay Balkrishna Jadhao
Written By: Dr Sanjay Balkrishna Jadhao
Category: Essay
Competition: Poetry and Creative Writing Competition 2026
In a poignant essay titled "मा, तूच माझी जनाई; आता तुझ्याच नजरेनं पाहीन हे जग!," Dr. Sanjay Balkrishna Jadhao honors the memory of his mother who passed away in August 2026. This submission to the Poetry and Creative Writing Competition 2026 is a deeply personal reflection on her life and values. Through intimate anecdotes and heartfelt gratitude, Dr. Jadhao captures the essence of a woman whose compassion and selflessness left an indelible mark on his life.
About the Work
Dr. Jadhao's essay is both a tribute and a farewell, resonating with themes of love, memory, and enduring influence. His narrative is rich with childhood memories, interwoven with reflections on his mother's virtues and her profound impact. The work is a touching exploration of the bond between mother and son, eloquently conveying the timeless wisdom imparted through everyday actions.
मा, तूच माझी जनाई; आता तुझ्याच नजरेनं पाहीन हे जग!
Original Submission by Dr Sanjay Balkrishna Jadhao
About the Work
"मा, तूच माझी जनाई; आता तुझ्याच नजरेनं पाहीन हे जग!" is a deeply personal letter by Dr. Sanjay Balkrishna Jadhao, written in memory of his mother, who passed away on August 30, 2026. It is a heartfelt tribute to a woman whose life embodied compassion, humility, devotion, selflessness, and a deep love for all living beings. Through intimate childhood memories, forgotten episodes, reflections, and expressions of gratitude, Dr. Jadhao recalls the values his mother imparted not through formal education but through her everyday actions. He reflects on her innate poetic and devotional expression, her kindness toward animals, her unwavering commitment to family, and the profound influence she had on his understanding of humanity. Beyond mourning her loss, the letter affirms the lasting bond between mother and son and his resolve to keep seeing the world through her eyes. It is both a personal farewell and a tribute to the timeless wisdom of an ordinary woman who lived an extraordinary life.
मा, तूच माझी जनाई; आता तुझ्याच नजरेनं पाहीन हे जग!
Original Submission by Dr Sanjay Balkrishna Jadhao
तोडकं-मोडकं जीवन जगूनही, "लोकांचं भलं व्हावं आणि त्याच्या पाठीमागे आपलं व्हावं," असं म्हणणारी एकमेव व्यक्ती म्हणजे तूच, मा! असा विचार केवळ संतच करू शकतात. श्री. विठ्ठल सोनवणे यांना तुझा जन्म झाला तेव्हा त्यांच्या घरात संत जनाबाईंचाच पुनर्जन्म झाला आहे, असे वाटले असेल.
तुला कोणतेही शालेय शिक्षण नव्हते. पूर्णपणे निरक्षर असूनही ओवीच्या प्रकारात तू स्वतःच्या मनाने सहजपणे शब्दांची गुंफण करायचीस आणि आपल्या अनोख्या शैलीत ईश्वराचे गुणगान गायचीस. किती विलक्षण पकड होती तुझी शब्दांवर! काही जण म्हणायचे, तू बडबड करतेस; काही म्हणायचे, तू वेडी आहेस. तुझी ही ईश्वरी गाणी ध्वनिमुद्रित करण्याचा एक उपक्रम मी हाती घेतला होता. त्यासाठी खूप विचार करून एकाला स्मार्टफोनही घेऊन दिला होता. मात्र, गेल्या आठ वर्षांत त्याने काय केले, हे त्याने मला कधीच सांगितले नाही. आता त्याला विचारावेसे वाटते-त्या उपक्रमाचे पुढे काय झाले?
तुला १९७२ चा भीषण दुष्काळ आठवत असेल. आपल्याकडील एक बकरी आजारी पडली होती. शेजारच्या कमलबाई म्हणाल्या होत्या, "अरे, बकरीला शेतावर घेऊन जा. हिरवा चारा खाईल, पाणी पिईल आणि ताजी हवा मिळाली तर लवकर बरी होईल." तू मला कडेवर घेतलेस आणि दुसऱ्या हातात बकरीच्या गळ्यातील दोरी धरून शेताकडे निघालीस. थोडे अंतर चालल्यानंतर वरखडी नदीच्या अलीकडेच, थोडे वर असलेल्या एका बाभळीच्या झाडाखाली ती बकरी पडली. त्याच वेळी दोन माणसे तिथे आली. मरणाच्या दारात उभ्या असलेल्या त्या बकरीचे पैसे देऊन ती विकत घेण्यास एक जण तयार होता, तर दुसरा म्हणाला, "देऊन टाका आणि पैसे करून घ्या," आणि निघून गेला. मी रडत रडत "बकरी विकायची नाही," असे म्हणत होतो. पण त्या एका मिनिटात तू बकरी न विकण्याचा निर्णय घेतलास. तो निर्णय तू कसा घेतलास, याचा मी आजही विचार करतो.
स्वार्थापेक्षा प्राण्यांवरील दयामाया आणि प्रेम यांचे महत्त्व मला पीएच.डी.पर्यंतच्या शिक्षणात एकाही शिक्षकाने शिकवले नाही; त्यांच्या कृतीतूनही ते कधी दिसले नाही. व्यक्तीच्या खऱ्या शालीनतेची, उदात्ततेची आणि सौजन्याची सर्वोच्च कसोटी ही ती व्यक्ती असहाय, परावलंबी, वृद्ध, शक्तिहीन आणि आपल्या उपकारांची परतफेड करू न शकणाऱ्या व्यक्तींशी तसेच प्राण्यांशी कशी वागते, यात असते; सामर्थ्यवानांशी ती कशी वागते, यात नव्हे. ही तुझी कृतीच दर्शवते, मा, की तू प्रेम, पावित्र्य, सौजन्य आणि सत्य या सद्गुणांचा संगम असलेली मूर्तिमंत प्रतिमा होतीस!
तूही बाबांप्रमाणेच कर्तव्यदक्ष होतीस. बाबा दरवर्षी श्रावण महिन्यात भगवद्गीतेचे पारायण करायचे. तू मात्र ते कधी ऐकलेही नव्हतेस; पण भगवद्गीतेतील कर्मयोगाचा अर्थ कदाचित तुला माहीत नसतानाही तो तू आपल्या आचरणातून जगलीस. बाबांच्या आजारपणात त्यांची सेवा करण्यासाठी तब्बल तेरा वर्षे तू माहेरी गेली नाहीस, हे मी विसरलो नाही. उलट, ही गोष्ट मी आवर्जून इतरांना सांगत असतो. आम्ही तिघेही तुझा आणि बाबांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवूनच पुढे वाटचाल करत आहोत. बाबांच्या निधनानंतरची पहिली तीन वर्षे तू जणू स्वतःचे भानच हरवून बसली होतीस. मात्र, हळूहळू स्वतःला सावरलेस आणि आमच्यासाठी पुन्हा उभी राहिलीस. बाबांच्या निधनानंतरही तू तब्बल ३५ वर्षे त्यांच्याशिवाय आयुष्य जगलीस. त्या प्रदीर्घ काळात किती आठवणी, किती एकटेपणाचे क्षण आणि किती संघर्ष तू मनातल्या मनात पचवले असशील, याची कल्पनाही आज मला करवत नाही.
१ ऑगस्ट रोजी, "देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी । तेणें मुक्ति चारी साधिलिया ॥" हा अभंग झोपेतून उठताना, डोळे पूर्णपणे उघडलेले नसतानाच, एकदाच कानात टाळ-मृदंगाच्या नादासह स्पष्टपणे गुंजला. थोडेसे चित्रही दिसले. भास झाल्यासारखे वाटले आणि मी डोळे उघडले. त्यानंतर बरोबर एक महिन्याने तू वाणी आणि मन न समजणाऱ्या जगापासून कायमचा निरोप घेतला.
मागच्या वर्षी जूनमध्ये पंधरा दिवस गावी थांबून तुझ्या दोन्ही डोळ्यांची मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करून घेतली. त्याच दिवशी तुला दिसू लागल्याचे संकेत मिळाले. दुसऱ्या दिवशी समोरचा गणेश आपल्याकडे आला. त्याच्या हातातील पांढरी अंडी घेऊन मी लहान मुलासारखी तुला दाखवली आणि विचारले, " मा, हे काय आहे?" तर तू त्वरित म्हणालीस, "भाऊ, ही कोंबडीची अंडी आहेत." तेव्हा सर्वजण हसले. मलाही हसू आले. पण मला खरोखरच खूप आनंद झाला. लोक सांगायचे की म्हातारपणी शस्त्रक्रिया यशस्वी होत नाही; पण तुझी शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि तुला दुसऱ्याच दिवशी दिसू लागले, याची मला प्रचीती आली. २०१४ मध्ये तुला मृत्यूच्या दारातून परत आणणे आणि यावेळी तुला पुन्हा दृष्टी मिळवून देणे, हे गेल्या कित्येक वर्षांतील माझ्या आयुष्यातील आनंदाचे अत्यंत दुर्मिळ आणि अविस्मरणीय क्षण होते.
भारतात होतो, तोपर्यंत दिवाळीच्या निमित्ताने अधूनमधून तुझ्या भेटीसाठी गावी येत होतो. नंतर अमेरिकेत आलो आणि गावी येणं जवळजवळ बंदच झालं. प्रत्येक वेळी घरून निघताना तू मला विचारायचीस. अगदी २०१८ मध्येही, पिंट्याच्या गल्लीत उभी केलेल्या गाडीपर्यंत तू तुरुतुरु चालत जात असताना, रस्त्यातच मला हळूच विचारले होतेस, “संजू, पुन्हा कधी परत येशील?” पण या वेळी घरातून निघताना तू हा प्रश्न का विचारला नाहीस, ते आता समजलं. आता तुझ्यासारखं मायेने विचारणारं कुणी राहिलं नाही. शेवटची नाळही तुटली. तू आता या जगात नाहीस, हा विचारच मुळात सहन होत नाही. तुझ्याविना हे जग आता पूर्वीसारखं राहिलेलं नाही, मा! पण आता यापुढे मी हे जग तुझ्याच नजरेने पाहीन.
Late Janabai Sonawane-Jadhao (c. 1939 - 30 August 2026)
About the Competition
The Poetry and Creative Writing Competition 2026 by Hashtag Kalakar invites participants from diverse backgrounds to share their unique voices and narratives. This esteemed platform celebrates creativity, offering writers an opportunity to express their thoughts and emotions through beautifully crafted prose and poetry.
We extend our heartfelt gratitude to Dr. Sanjay Balkrishna Jadhao for sharing "मा, तूच माझी जनाई; आता तुझ्याच नजरेनं पाहीन हे जग!" with us. His moving tribute is a testament to the profound bond between mother and child. Thank you for enriching the Poetry and Creative Writing Competition 2026 with your poignant reflections.
About Hashtag Kalakar
Hashtag Kalakar is a creative platform dedicated to providing artists, writers, singers and other creative talents with opportunities to showcase their work and reach wider audiences through competitions, features and creative initiatives.




Comments