top of page

मला घर हवयं - By KANCHAN DEVIDAS PACHKUDVE

2 hours ago
3 min read

Written By: KANCHAN DEVIDAS PACHKUDVE

Category: Poetry

Competition: Poetry and Creative Writing Competition 2026

In her evocative poem "मला घर हवयं," KANCHAN DEVIDAS PACHKUDVE eloquently explores the themes of belonging and identity. Written as part of the Poetry and Creative Writing Competition 2026, this moving piece delves into the societal expectations and personal desires that shape a woman's life journey. KANCHAN's poignant words reflect a deep yearning for a place to call one's own, resonating with anyone who has ever sought their rightful place in the world.

About the Work

KANCHAN DEVIDAS PACHKUDVE's "मला घर हवयं" is a powerful commentary on societal norms and the personal struggle for identity and security. The poem uses vivid imagery and a strong narrative voice to express the emotional turmoil experienced by women who are caught between familial duties and personal aspirations. The work questions the traditional views on women's roles, seeking justice and autonomy in a world that often denies them a place of their own.

मला घर हवयं "

Original Submission by KANCHAN DEVIDAS PACHKUDVE

"मला घर हवंय "

मी पप्पांची परी,

भावाची बहीण,

नवऱ्याची बायको,

पण मला माझं घर हवंय...

तुम्ही म्हणाल हे काय नवीन

एक मुलगी म्हणून सगळं तर तुझंचं यं...

कशाला हवंय तुला घर...

हो मी मुलगी म्हणून चं घर मागतेय,,,,

तेही माझ्या हक्काचं माझ्या नावावर असलेलं...

जिथून मला कोणीच "निघ" माझ्या घराच्या बाहेर म्हणणार नाही....

यासाठी मला घर हवंय...

होय....रोज होतेय माझी कुचंबना..

जेव्हा तू परक्याचं धन म्हटलं जातं,,

तुझं या घरात काहीच नाही,,,

होय,,. तेव्हा होतेय माझी कुचंबना...

जेव्हा सासरी गेल्यावर

तिथली माणसं म्हणतात..

तू दुसऱ्याच्या घरातून आलीस..

हे घर आमचं आहे..

होय..तेव्हा होतेय माझी कुचंबना...

लग्नानंतर आई वडिलांच घर सोडलं..

सासरचा ही ओलांडला उंबरठा..

तर तिला तिच हक्काचं घर नाही ..

अन् माहेरी थारा नाही... कारण आता भावजई म्हणतेय.. (भावाची बायको )

हे माझं घर तू आणि तुझं सासर बघून घे ,,

तुझं लग्न झालंय..

होय..तेव्हा होतेय माझ्या मनाची कुचंबना ....

कायदा सांगतो लग्नानंतर मुलीच घर सासरच,,

पण नवऱ्याच्या नावावर नसेल तर बायकोला कसं मिळेल...

किती मोठा हा "घोटाळा" तिच्या आयुष्याचा..

इकडून तिकडे... तिकडून इकडे तिला फिरवलं जातं..

पण हक्काचं तिचं असं काहीच नसतं....

होय..तेव्हा होतेय माझ्या मनाची कुचंबना...

असेल ती शिकलेली,,, आणि घेतलं स्वतः चं "घर"

तर जग म्हणतं बिघडलेली असेल ती दिलं असेल कोणीतरी...

डायरेक्ट चारित्र्यावर लावला जातो "डाग"....

तेंव्हा मनात होते,.. मुलगी म्हणून का? जन्माला आले,,,याची आग...

होय. तेंव्हा होतेय माझ्या मनाची कुचंबना....

ती फक्त आयुष्यभर "घर - घर" करत राहते...

देता आला तर तिला " न्याय" द्या..

पप्पाच्या "परी"ला पप्पा च्याच घरी एक "वन BHK" नावावर करुन द्या...

कारण तुम्ही स्वतः च्या मुलीला जरं दिली किंमत तर तिची "घर - घर"होणार नाही...

आणि सासरचे असो की माहेरचे,,

तिला तुझं "घर" नाही असं कोणीच म्हणणार नाही....

तुमच्याच घरात ती आई बरोबर राब - राब राबलेली असते..

आई नसताना तिनेच,,

आवरलेला असतो पसारा...

माहेरीच शिकते ती सासरचा संसार सारा...

मग माहेरी का नाही तिला एका घराचा आधार...

जन्म देता आणि परक्याचं धन म्हणता..

जन्म दात्यालाच किंमत नसेल...

तर सासर तरी कसं करेल तिचं कौतुक....

परक्याचं धन म्हणून फक्त हट्ट नका पुरवू,,,

होय, तिला खंबीर राहायला ही शिकवा....

लग्नानंतर तिची जबाबदारी तिचा नवरा घेईल..

"म्हणून" भाऊ ही होतो उपरा...

दोन शब्द तिच्यासाठी फक्त आपुलकीचे वापरा...

तुम्ही म्हणाल भावनांचा खेळ सारा..

असं कुठं असतं का???

मग माहेरी आणि सासरी घर नसलेल्या मुलींनी "घर घर" करत राहायचं का?

म्हणून मला घरं हवंय...

मला माझं घर हवंय...

About the Competition

The Poetry and Creative Writing Competition 2026 by Hashtag Kalakar is a prestigious platform celebrating diverse voices and creative expression. This competition invites poets and writers from around the world to submit their original works, fostering a global community of literary talent. Participants explore a wide range of themes and styles, contributing to a rich tapestry of contemporary literature.

We extend our heartfelt gratitude to KANCHAN DEVIDAS PACHKUDVE for sharing "मला घर हवयं" with us. This profound contribution to the Poetry and Creative Writing Competition 2026 reflects her exceptional ability to capture the complexities of identity and belonging. Thank you, KANCHAN, for your inspiring words and for shedding light on such an important topic.

About Hashtag Kalakar

Hashtag Kalakar is a creative platform dedicated to providing artists, writers, singers and other creative talents with opportunities to showcase their work and reach wider audiences through competitions, features and creative initiatives.

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page