मज राष्ट्र वीर
By Bhagyashri Babanrao Ghuge
लहू वीर सैन्यांचे मज हाथा श्रृंगार असो,
मनी मज वीरांसाठी सदैव श्रद्धा व आभार असो.
‘बळ’ मज वीरांचा जणू इंद्राचेच दिव्य अस्त्र,
‘छळ’ पराजित करे जणू धरिले न्यायाचे शस्त्र.
उजागर कर संता, मनी सदैव वीरांची भक्ती,
निज राष्ट्रात गजर मुखी करो मज वीरांची उक्ति.
द्यावा ‘विश्व-बंधुत्वाचा’ संदेश, मज अशी अभिलाषा,
हे राष्ट्रभक्त,तूच बंधुत्वाने घडव ही आकांशा.
घडवून शांतता, मज वीर सैनिक जगास श्रृंगार असो,
मनी मज वीरांसाठी सदैव श्रद्धा व आभार असो.
By Bhagyashri Babanrao Ghuge

Comments