top of page

भाज्यांची किलबिल

Apr 27, 2023
3 min read

By Floria Simon Fernandes


भेंडी : मी आहे भेंडी, हिरवा माझा रंग,

मधुमेह कमी करीन, चला माझ्या संग.

अंग माझे सरळ, उंची माझी लांब,

बद्धकोष्ठते वर उपचार, करते भारी काम.

प्रथम धुवा, नंतर कापा, बिळबिळीत होतील हात,

रोग प्रहतकार शक्ती वाढण्या, देईन तुमची साथ.

मसाला भरा, तेलात तळा, बनवा चविष्ट भाजी,

दृष्टी तुमची सुंदर बनविन, कमाल बघा माझी.



बटाटा : किती करशील बडबड तू ?? आता तोंड बंद कर !!

गोल मटोल शरीर माझे, मी आहे तुझ्या वर.

सगळ्या भाज्यांसंग आहे, मैत्री माझी न्यारी,

फ्रेंच - फ्रायर्ज, वेफर्स, चिप्स, चव लागे ईकती भारी.

'बटाटा - वडा' प्रसिद्ध आहे, विके दारो दारी,

कर्क-रोग्याला रस माझा, द्या बारी-बारी.

भाजलेल्या जखमेवर, लावा माझी साल,

डोळ्यांखालच्या काळ्या वर्तुळांवर, बघा माझी कमाल.




वांगी : सगळ्या भाज्यांची मी राणी, मुकुट हिरवा डोक्यावर,

कान विटले माझे बटाटया मोठेपणा तुझा बंद कर.

त्वचेची गुणवत्ता वाढवते, जांभळा माझा रंग भारी,

मेंदू -पेशीचे रक्षण करते, आरोग्य आणते तुमच्या दारी.

गोल, लांब, लहान, मोठी, सगळ्या आकारात मी हजर,

संधिवातस मी करी प्रतिबंध, नका लावू मला नजर.

कर्करोग ,पचन प्रोत्साहन, मधुमेहावर, मी ही करते उपचार,

कोलेस्ट्रॉलवर घरगुती उपचार, माझ्या पासून साकार.



टोमॅटो :लाल लाल रंग माझा, मी टमाटर लाले-लाल,

चेंडू सारखे गोल, गुबगुबीत आहेत माझे गाल.

लाल, हिरवा, पिवळा, चेरी, वेगवेगळे असे माझे प्रकार,

अँटी- ऑक्सिडेंट देई मी, कमी करतो हृदय विकार.

पुर:स्थ कर्करोग , अकाली वृध्दत्व, ह्यावर मी घरगुती उपाय,

मूत्रमार्गच्या संसर्गास दोषांस मात देणं, हे मला सोपे फार.

सॉस, रस, सुप, कोशिंबीर बनवा, कसंही मला खा,

पाककृतीची चव वाढवतो, बोटाने चाखून पहा.





कांदा :कांदा मी दिसे घरो-घरी, पोट माझे गोल,

उघडून पहा अंग माझे, पकळया माझ्या सोल.

पांढरा ,लाल, तापकिरी, हिरवा, असा मी रंगेबेरंगी,

प्रत्येकाचे पौष्टीक मूल्य सांगू ?? ये तू माझ्या संगी.

संदी, ताप, वेदना, अधिहर्षतास, घ्या मला जेवणात टाकून,

त्याग माझा होताना मात्र, सोडीन मी सगळ्यांना रडवून.

अँटीकॅगुलंट, विरोधी- दाहक, गुणांनी मी आहे भरलेला,

सदा निरोगी व स्वस्थ रहा, आशीर्वाद राहो माझा सदा.





फुलकोबी :मी एक सुंदर फुल, नाव माझे 'फुलकोबी',

फुलांचा एक बगीचाच मी, त्यात फुले लहान-मोठी.

पांढरा, हपवळा, जांभळा असे, तीन रंग, तीन प्रकार,

भिन्न-भिन्न पौष्टिकता त्यात, नका देऊ मला नकार.

लठ्ठपणा, स्ट्रोक, पेशींचे वाढ, ह्यावर माझे पूर्ण लक्ष,

कर्करोग, अकाली-वृद्धत्व, कमी होई मज समक्ष.

भाजी, सूप, कोशिंबीर,पराठा, अश्याअनेक करा कृती,

आरोग्याने परिपूर्ण देह माझा, बनवी निकोप, देई स्फुर्ति:





गाजर :शरीर माझे शंकू सारखे, जसा आईक्रीमचा कोन,

संपूर्ण गुणाने भरलेला मी, सांगेल ह्यांना कोण ??

लाल, भगवा, जांभळा, सफेद, असे रंग माझे छान,

केक, हलवा, लोणचे बनवा, करा तुकडे लहान-लहान.

जंत उपद्रव, नेत्र दृष्टीसाठी, वापरा मला जपून,

धरती मातेच्या कुशीत मी, बसतो कसा लपून.

रात्र – अंधळेपणा वर देतो मात, मी आहे नैसर्गिक रेचक,

पोटातील जंतासाठी आहे, मी भारी पाचक.



कारले : ऐकून माझे नाव, तोंड नका फीरवू,

आहे सगळ्यांची काळजी मला, जरी आहे कडू .

मलेरिया, कावीळ, मधुमेह सारख्या, रोगांना देते मी मार,

पोटाच्या, यकृताच्या रोगांना, करतो तडीपार.

मूत्रशय, कर्करोगावर उपाय माझा छान,

असा सोन्यासारखा मौल्यवान मी, समजू नका लहान.

अंगावर माझ्या काटे जरी, न दुखवी मी कुणाला,

रोग–प्रतिकार शक्ती वाढवून, सामर्थ देई सगळ्यांना.





पालेभाजी : मी आहे हिरवीगार, नाव माझे पाले भाजी,

सॉस, भाजी, कोशिंबीर, लोणचे, अन्यथा बनवा कुरकुरीत भजी.

रस प्या, वजन घटवा, बनवा चवीष्ट सुप,

केस, नखे, हाडांसाठी उत्तम, निखरा चेहऱ्याचे रूप.

मेथी, शेगुल, पुदीना, शेपू, पौष्टीक आहे फार,

हृदय, डोळे ,कर्क , मेंदू ह्यावर, कृपा माझी अपार.

निर्जलीकरण कमी करा, रोग प्रतिकार शक्ती वाढवा,

जीवनसत्वे व खनिजे भरपूर घ्या, जीवन तुमचे सुंदर सजवा.


सगळ्या भाज्यांची किलबिल ऐकुन

मना आनांद झाला फार,

औषधी व प्रथिनांनी भरपूर,

ताटात घ्या सांतुलीत आहार.






Recent Posts

See All
Mirrored Truth

By Rufaida Manzoor I stood beside the silent lake, With eyes that felt no urge to break. My hair fell low in shadows deep, The waters...

 
 
 
My Antidote

By Anveeksha Reddy You fill my books with your ink, seeping into the pages bright and brilliant The words etched into the cracks of it,...

 
 
 
Avarice

By Anveeksha Reddy You tear my skin and pick on my bones I label it as gluttony for you Churning and shattering the remains of my...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page