"बालपण"
By Snehal Santosh Tawate
बालपण लहानपण किती ते छान असतं, भान न ठेवता जगण्याच हेच तर वय असतं.... खेळता खेळता जरी पडलो तरी रडून मोकळं होता येत, मोठ झाल्यावर मात्र रडताना सुद्धा विचार करून रडाव लागत... भावंड, मित्र, शेजारी, नातलग सगळ्यांशीच मोकळं बंधन असतं, मोठ होता होता मात्र मोकळेपणाच विसरायला होतं...
कुणाशीही बोलताना कसलच भय मनात नसत, मोठ झाल्यावर मात्र जरा विचारच करून बोलावं लागतं... प्रश्नांना मर्यादा जिथे नसते असं लहानपणच छान असत,
कारण
उत्तर जेव्हा सापडायला लागतात तेव्हा मोठं झाल्याचं जरा ओझ वाटत.. खरच निरागस मनाने भरलेलं बालपण किती ते छान असत, भान न ठेवता जगण्याचं हेच तर वय असत...
By Snehal Santosh Tawate

Comments