बरे नव्हे
- Hashtag Kalakar
- May 8, 2023
- 1 min read
By Omkar Mohile
लपून बसणे ढगाआडूनि, बरे नव्हे
हळूच हसणे सरीबरोबर, बरे नव्हे
शोधत होतो काठ किनारे कितीक मी
प्रतिबिंबातून फसवून जाणे, बरे नव्हे
उतरून आलीस ढगांबरोबर धुंद पहाटे
भेट न घेतां धुक्यात विरणे, बरे नव्हे
मला वाटले वारा सांगेल तुझा ठिकाणा
फसवा पत्ता त्यास सांगणे, बरे नव्हे
वाटांवरती जाई-जुईचे सडे सांडले
असा गोजिरा चकवा रचणे, बरे नव्हे
निराश होऊन परतीसाठी रान सोडतां
आशा लावून बरसून जाणे, बरे नव्हे
जपली आहे मनात माझ्या याद तुझी मी
कवितेमधुनि येणे जाणे, बरे नव्हे
By Omkar Mohile

Comments