बंध प्रेमाचा
By Shubhangi Ashish Deoorkar
बंधनात बांधले स्वतःला
तरी ओढ तुझी संपत नाही
बंदिस्त या वेड्या मनाला
आवरले तरी आवरत नाही
तुझ्या भावनांचा गंध
मज असा मोहवून जातो
मिठीत तुझ्या शिरल्यावर
बांध भावनांचा वाहतो
तुझ्याशिवाय नाही मी रे
अपूर्ण माझे अस्तित्व
तुझ्यामुळेच तर आहे
माझ्या जगण्याचा अर्थ
By Shubhangi Ashish Deoorkar

Comments