प्रेमाची झुळूक
By Ramendra R. Padelkar
प्रेमाची झुळूक, प्रीतीचा वारा
बरसती स्नेहाच्या रिमझिम धारा
कोसळती आपुलकीच्या शीतल गारा
हृदयात तळपतो शुक्र तारा
अथांग समुद्राचा शांत किनारा
घडवू सुख समृद्धीचा निवारा
स्पर्श तुझा अनोखा शहारा
जीवनाचा माझा खरा सहारा
सहवास तुझा वाटे प्यारा
मनास भेटिविना नाही थारा
तुझ्या प्रेमराज्याचा राज दुलारा
तुझ्याविन कसा होईल गुजारा
तुझ्याशिवाय साऱ्यांचा उडे बोजवारा
दर्शन तुझे होता दुःखाचा उतारा
प्रेमभक्तित रंगला परिसर सारा
विचार भविष्याचा महिने बारा
जीवनाचा जागा अनुभव न्यारा
वर्तनाचा प्रेमळ शिक्का मारा
ऋणानुबंधाच्या जुळती मधुर तारा
कर्तृत्वाचा होई जगभर पसारा
By Ramendra R. Padelkar

Comments