प्रेमाचा गेम
By Ketan Phadke
एक दिवस तु काही न बोलता निघुन गेलीस, सोप्या माझ्या मनाला वेडा पिसा करुन गेलीस, ऊचलला नाहीस माझा फोन आणि केला नाही मेसेज, अशी कशी संपली गं आपल्या नात्यातली क्रेझ… मला खास मित्र म्हणणारी तु लोटतेस आता मला दूर, कळत नाही कधी थांबेल माझ्या अश्रुंचा पुर, मन जळतं जेव्हा पाहतो देतेस तु इतर सगळ्यांना वेळ, वाटते खेळतीयेस माझ्या सोबत कसला तरी विचित्र खेळ…
वाटते सारखे की आत्ता येशील तु परत, असतो त्याच आशेत रोज मी झुरत, कदाचित तुला कधीच कळणार नाही माझं प्रेम, आणि चुकिच्या नोट वरचं संपेल हा सगळा गेम..
By Ketan Phadke

Comments