top of page

प्रेम

By Atharva Arvind Andore





प्रेम. प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, खरंतर तुमचं आमचं ते कधीच सेम नसतं. प्रेम हे कधी माणसावर, कधी प्राण्यांवर तर कधी एखाद्या वस्तूवरसुद्धा असतं. त्याला मर्यादा नसते तर बांधिलकी असते. ते कधी विश्वासापलीकडे एका आसमंतासारखी मोकळीक देणारं असतं तर कधी अविश्वासाच्या चौकटीत बांधलेलं एखाद्यावर मालकी हक्क दाखवणारंही असतं. डोळे मिटता मनात एखादं गाणंही गुणगुणायला लावणारं असतं तर कधी एखाद्या गाण्यातून तेच डोळे पाणावणारंही असतं. कधी ते विनाशर्त जीव लावणारं असतं तर कधी सोयीस्कररित्या दाखवलं जाणारंही असतं. ते असतं कधी आपल्या आपुलकीमध्ये तर कधी श्रद्धेतही झळकतं. त्याला ये म्हटलं की येणारं नसतं तर न बोलावता मनात घर करणारं असतं. ते दिसतं कधी श्वानांच्या ईमानदारीत तर कधी वासरांच्या डोळ्यांत तरंगतं. हा निसर्ग, ही पृथ्वी, हे जग प्रेम करायला शिकवतं पण आपण आपल्या सोयीने फक्त आणि फक्त त्याचा दिखावाच करतो. कोणाला प्रेम या माणूसजन्मात खरोखर करायला जमतं तर कोणाला त्याचा अर्थही उमगत नाही. कोणी प्रेमाने बरसतं तर कोणी त्याच प्रेमामुळे तरसतं. कधी प्रेम हे नात्यांपलीकडे जाऊन केलेलं असतं तर कधी असलेल्या नात्यांतही ते शोधावं लागतं. म्हणूनच म्हणतो ना, की प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,खरंतर तुमचं आमचं ते कधीच सेम नसतं..!!


By Atharva Arvind Andore




Recent Posts

See All
Mother I Am Alive

By Adesope Adisa The essence of my gender and being a woman has been something I struggled to grapple in my words on said, glances observed and in the synthesis of my surroundings in my subconscious.

 
 
 
The Invisible American

By Rishika Tipparti graduate student killed in January 2023 by a speeding Seattle Police officer, who was going 74 mph in a residential area. He later mocked her worth, stating that she had “limited v

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page