प्रतिरुप
By Snehal Santosh Tawate
प्लास्टिक सारखं "Use and Throw"
आयुष्य तर आपल झालं नाहीय ना?
गरज संपता ही व्यक्ती कोण, अस तर आपण म्हणत नाही ना?
वेगवेगळया स्वप्नांच्या हया दुनियेत फक्त पैसा हे आपले ध्येय नाही ना ? पैसा हा एक पर्याय झाला, माणूस म्हणून आपण हरवलो नाही ना? स्पर्धा तर आहे प्रत्येक ठिकाणी पण आपण त्यात उतरलोय ना? अखेर आरश्यात दिसणाऱ्या प्रतिमेशी स्पर्धा करणं, विसरलो तर नाही ना?
कामात व्यस्त असणारा माणूस स्वतःला तर विसरला नाही ना? व्यस्त आयुष्यातून थोड स्वतःसाठीही जगणं राहून गेलं नाही ना? छान आहे आयुष्य समाधानाने आपण जगतोय ना? आपल्या समाधानाने समोरचालाही थोड देऊन, आनंद नक्की वाटतोय ना? आयुष्य लहान आहे म्हणता म्हणता जगायला थोडी सुरुवात उशिरा झाली नाही ना?
उशिरा का होईना पण चांगला माणूस म्हणून कायमच समाजात रहायचय ना ?
By Snehal Santosh Tawate

Comments