पपेट स्टोरी - By Netra Shrotri
Written By: Netra Shrotri
Category: Short Story
Competition: Poetry and Creative Writing Competition 2026
In the 2026 Poetry and Creative Writing Competition hosted by Hashtag Kalakar, Netra Shrotri presents "पपेट स्टोरी," a charming short story. The narrative, set against a school background, captures the tender moments of young love shared between two classmates, Nihar and Niharika. This Marathi tale delicately unfolds with a playful yet heartfelt exploration of secret gestures and innocent emotions.
About the Work
"पपेट स्टोरी" is a whimsical narrative infused with the innocence and secrecy of first love. The story unfolds through clandestine meetings and playful exchanges between the young protagonists. Netra Shrotri weaves a tale filled with vivid imagery and tender moments, capturing the essence of youthful romance with sincerity and charm. The use of traditional elements like notes and puppets adds a nostalgic touch to this delightful story.
पपेट स्टोरी
Original Submission by Netra Shrotri
short story
पपेट स्टोरी -
निहार आणि निहारिका एकाच शाळेत एकाच वर्गात इयत्ता १० मध्ये शिकत आहेत. दोघे एकाच बिल्डिंगमध्ये रहात आहेत. रोज संध्याकाळी दोघे गच्चीत येऊन गुपचूप एकमेकांवरच प्रेम चोरीछुपे इशारे करत, तर कधी मोका मिळाला तर गप्पा मारत व्यक्त करत असत. एक दिवस गच्चीवर कोणाच्या लक्षात येणार नाही असे दोघे एकमेकांकडे चोरून बघत होते. कोणाच लक्ष नाही बघून तो तिला एक फ्लाइंग कीस देतो . तिला बोटाने हार्ट चा इशारा करतो. आधी ती लाजते मग हळूच ते पकडून तिच्या हृदयात गेल्याची action करते. ती त्याला हळूच डोळा मारते. तो जणू त्याच्या हृदययाला घायाळ करून गेल्याची तो action करून दाखवतो. आता अंधार पडल्यामुळे दोघे हातात मोबाईल घेऊन एकमेकांशी मोबाईलवर बोलू असे दाखवतात.
बेडवर झोपून तिनी हातात तिचा लाडका टेडी बिअर धरला आहे आणि त्याच्याबरोबर chatting करते आहे. तो त्याच्या खोलीत बेडवर बसला आहे आणि तिच्याशी chatting करण्यात मग्न आहे. त्याच्या आजूबाजूला दफ्तर आहे. काही पुस्तके आणि गाईड्स इथे तिथे पडली आहेत. काही बंद तर काही उघडी अशी पडली आहेत. मोबाईलवर तो तिला सगळे हार्टवाले इमोजी पाठवतो. ती लाजल्याचा आणि मिठी मारल्याचा इमोजी पाठवते आहे. ती त्याला “आय लव यु “ असा मेसेज सेंड करते.
तो तिला रिप्लाय देणार इतक्यात त्याची आई रूममध्ये डोकावते. तो घाईघाईने मोबाईल टाकून पुस्तक हातात घेऊन वाचतो आहे अस दाखवतो. पण पुस्तक उलट धरलेलं आहे. आईच्या ते लक्षात येत आणि ती आत येऊन ते पुस्तक सरळ करते. त्याला रागाने अभ्यास नीट कर अस सांगते. तो मानेने हो हो म्हणतो आणि पुस्तक वाचायला लागतो. ते पाहून आई समाधानाने रूम बाहेर निघून जायला लागते. तो घाईघाईत मोबाईल हातात घेऊन तिला मेसेज करायला जातो इतक्यात आई पाठीमागे वळून बघते आणि त्याच्या हातात मोबाईल पाहून प्रचंड चिडते. दहावीत आहेस. एकतर अभ्यास तरी कर नाहीतर झोप अस म्हणत त्याचा मोबाईल त्याच्या हातातून काढून घेऊन लाईट बंद करून ती बाहेर निघून जाते.
तिच्या मेसेजवर त्याचा रिप्लाय येत नाही. पण ब्लु टिक आल्यामुळे त्याने तो पहिला आहे हे तिला कळत आहे. आता तिला राग आला आहे आणि चिडून ती फेकाफेक करत आहे. टेडीवर डोक ठेऊन रडते आहे आणि मोबाईलवर आता ब्रेक अप असा मेसेज करत आहे. हातात तोंड लपवून हुंदके देते आहे.
इकडे तो आई गेल्याच पाहून हळूच पांघरूण काढून फेकून देतो आणि एका वहीतल फुल स्केपच पान फाडतो आणि त्याच एक पपेट कबुतर तयार करतो. आता दुसर पान फाडून त्यावर काहीतरी लिहिताना दिसतो आहे. ती चिट्ठी तो पपेट कबुतराच्या मानेला दोर्याने बाधतो आहे. टेबलवर असलेला टेपरेकॉर्डर काढून हातात घेतो आणि हे सगळ घेऊन दार उघडून बाहेर डोकावून पहातो. कोणी नाहीये बघून तो रूम मधून बाहेर पडून तो गच्चीवर जाऊन उभा रहातो. खाली तिच्या खोलीची खिडकी आहे. तो टेपरेकॉर्डरवर “कबुतर जा जा” ची ट्यून चालू करतो आणि पपेट कबुतर तिच्या खिडकीसमोर वरखाली हलवायला लागतो.
तिच्या खिडकीबाहेर एक पपेट कबुतर उडताना दिसतं आहे. मागे कबुतर जा जा ची ट्यून ऐकायला येते आहे. त्याच्या गळ्यात एक चिट्ठी दिसते आहे. तिचं लक्ष गाण ऐकू आल्यामुळे खिडकीकडे जात. ती ते पपेट बघते आणि आश्चर्याने काय आहे म्हणून बघायला येते. त्याच्या गळ्यात काहीतरी बांधल आहे अस बघून त्याला पकडते आणि ती चिट्ठी काढून वाचते. त्यात लिहिलेलं असत ..आई आली आणि ती मोबाईल घेऊन गेली. But I love you too..ती आनंदाने हसत चिट्ठी छातीशी धरत डोळे बंद करून घेते आणि ती सुद्धा एक चिट्ठी लिहून त्याला अडकवते. त्या दोरीला हिसका देते. तो ते पपेट वर ओढून घेतो त्यावर लिहिलेलं असत, “सॉरी” लव लव लव ...आणि मागे ती मोबाईलवर गाण लावते, “ दिल दिवाना बिन सजना के माने ना.............”.
समाप्त .
About the Competition
The Poetry and Creative Writing Competition 2026 by Hashtag Kalakar is a prestigious platform celebrating diverse literary talents. Writers from around the globe showcase their works in various categories, including poetry, short stories, and essays. It provides an opportunity for participants to express creativity and share their unique voices with a broader audience.
Thank you, Netra Shrotri, for sharing "पपेट स्टोरी" with us. Your contribution to the 2026 competition adds a layer of warmth and creativity, reminding us of the beauty of young love. We appreciate your storytelling and look forward to more of your enchanting narratives.
About Hashtag Kalakar
Hashtag Kalakar is a creative platform dedicated to providing artists, writers, singers and other creative talents with opportunities to showcase their work and reach wider audiences through competitions, features and creative initiatives.




Comments