नव्या कविता…
- Hashtag Kalakar
- Jan 8, 2025
- 1 min read
Updated: Jul 15, 2025
By Saili Parab
गीत मनीचे माझ्या, येई तुझ्या ओठांवर,
स्वर छेडिता मी, रचिलेस काव्य तू मनोमनी…
असे वाटेवरी चालताना, पावलखुणा तू उमटवल्यास,
जुन्याच त्या वाटेवरी, नवीन आठवणी साठवल्यास…
रस्ते नवे शोधू आता, नकोत त्या पावलखुणा,
मी माझे, तू तुझे वेगवेगळेच रचू आता नव्या कविता…
By Saili Parab

Comments