नवरा बायको असल्यासारखे बोलतो आपण
By Poonam Subhash Jadhav.
कधी रडतो,
तर कधी एकमेकांच्या आठवणीत एकटेच हसतो आपण,
कधी रुसतो तर कधी एकमेकांना मनवतो आपण,
कधी रागवतो तर कधी एकमेकांचे,
डोळे पाणावतो आपण,
कधी मस्करी करतो,
तर कधी स्वतःपेक्षा जास्त एकमेकांची काळजी करतो आपण,
एकमेकांसाठीच बनलोय आपण,
म्हणून तर कधी कधी,
नवरा बायको असल्यासारखे बोलतो आपण..
By Poonam Subhash Jadhav.

Comments